MLC Election : विधानपरिषदेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार ठरले; काँग्रेस, शेकापने घेतली उमेदवार जाहीर करण्यात आघाडी

Vidhan Parishad Election News : विधानपरिषदेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेने तीन मतदारसंघातील उमेदवार जाहीर करत बाजी मारली आहे.
AAP leaders announce independent contest in Pune and other Maharashtra municipal corporations after MVA seat-sharing dispute.
AAP leaders announce independent contest in Pune and other Maharashtra municipal corporations after MVA seat-sharing dispute.Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राज्यात वेगवान घडामोडी घडत आहेत. महायुती व महाविकास आघाडीच्या गोटात सध्या उमेदवारी जाहीर करण्याची गडबड सुरु आहे. त्यातच महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. सुरुवातीला आघाडीचे जागावाटप फायनल केले त्यानंतर आता विधानपरिषदेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेने तीन मतदारसंघातील उमेदवार जाहीर करत बाजी मारली आहे. त्यानंतर काँग्रेसचे दोन तर शेकापचा एक उमेदवार ठरला आहे.

आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार मराठवाड्यातील परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ संख्याबळानुसार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या (Shivsena) वाट्याला आला आहे. त्या जागेवर महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून डॉ. विवेक नावंदर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. याठिकाणी नावंदर यांची लढत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारसोबत होणार असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

AAP leaders announce independent contest in Pune and other Maharashtra municipal corporations after MVA seat-sharing dispute.
MVA Candidate : मविआच्या घोषणेनं विधानपरिषदेसाठी तगडी लढत, उदय सामंतांच्या कट्टर विरोधकाला उमेदवारी, भाजपशीही आहे थेट संबंध

धाराशिव-बीड-लातूर मतदारसंघासाठी महाविकास आघाडीतून काँग्रेस (Congress)पक्षाने महेश देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर महाविकास आघाडीतून शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल कदम हे नाशिक मतदारसंघाचे उमेदवार असणार आहेत. अमरावती मतदारसंघातून महाविकास आघाडीमधून काँग्रेस पक्षाचे हर्षजित देशमुख उमेदवार असणार आहेत. त्यामुळे आता हे उमदेवार सोमवारी उमेदवारी दाखल करणार आहेत.

AAP leaders announce independent contest in Pune and other Maharashtra municipal corporations after MVA seat-sharing dispute.
MVA Candidate : मविआच्या घोषणेनं विधानपरिषदेसाठी तगडी लढत, उदय सामंतांच्या कट्टर विरोधकाला उमेदवारी, भाजपशीही आहे थेट संबंध

महाविकास आघाडीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शरद तायडे हे जळगाव मतदारसंघाचे उमेदवार असणार आहेत.तर महाविकास आघाडीतून शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे उमेदवार असणार आहेत. शिवसेनेच्या या उमेदवारांची घोषणा शिवसेना नेते व आमदार अंबादास दानवे यांनी केली आहे.त्यासोबतच पुणे मतदारसंघातून महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाकडून श्रीकांत पाटील यांचे नाव फायनल करण्यात आले आहे.

AAP leaders announce independent contest in Pune and other Maharashtra municipal corporations after MVA seat-sharing dispute.
BJP News : विधान परिषदेची निवडणूक जाहीर होताच परभणी-हिंगोलीवर भाजपचा दावा, जिल्हाध्यक्ष भुमरे म्हणतात, आमच्याकडे दीडशेवर मतदान!

शेतकरी कामगार पक्षाने रायगड-सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघासाठी अरविंद म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.आगामी काळात होत असलेल्या विधानपरिषद निवडणुकीत राज्यभरात दुरंगी लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वच विधानपरिषदेच्या मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी दुरंगी लढत होणार आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

AAP leaders announce independent contest in Pune and other Maharashtra municipal corporations after MVA seat-sharing dispute.
Maharashtra politics : शिंदेंच्या सेनेत निधीवाटपावरून खदखद व्यक्त होताच ठाकरेंच्या नेत्याचा दावा; म्हणाले,'मोठी उलथापालथ होऊन काही नेते पक्ष सोडतील'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com