Ankush Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik MNS : मराठी पाट्यांसाठी मनसे पुन्हा आक्रमक; 'खळ्ळखट्याक'चा दिला इशारा

MNS Ankush Pawar : जिल्हाध्यक्ष पवार यांनी मनसेस्टाईल खळ्ळखट्याकचा इशारा दिला.

Arvind Jadhav

Nashik News : मराठी पाट्या लावण्याबाबत कोर्टाने आदेश देऊनही अनेक संस्था, उद्योगांनी त्याकडे दुर्लक्ष केले. पोलिस आणि प्रशासनाने या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागवून घेतलेली मुदत संपली आहे. एकंदरीत यातील गांभीर्य सर्वांना पटावे, यासाठी मनसैनिकांना पुढाकार घ्यावा लागणार असून, आता मग्रुरांना मनसेस्टाईल आंदोलनाने धडा शिकवला जाईल, असा इशारा मनसेचे जिल्हाप्रमुख अंकुश पवार यांनी दिला आहे.

‘मराठी’साठी मनसैनिक पुन्हा त्याच आक्रमकतेने मैदानात उतरणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी करणाऱ्या मनसैनिकांना पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी अद्याप ग्रीन सिग्नल दिलेला नाही. त्यामुळे राज ठाकरे काय भूमिका घेतात, यावर नाशिक लोकसभेचे गणित अवलंबून असणार आहे. वास्तविक राज ठाकरे यांचा दौरा आणि त्यांच्या भाषणांमुळे निर्माण होणारे वातावरण यापलिकडे स्थानिक पदाधिकारी पाहत नाहीत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

परिणामी एक निवडणूक ते दुसरी निवडणूक यादरम्यान पक्षाचे पदाधिकारी सक्रिय नसतात. एखादे-दुसरे आंदोलन करण्यापलिकडे पक्ष पोहोचत नाही. पक्षाचे अस्तित्व दाखवून देण्यात स्थानिक पातळीवर सातत्याने अपयश मिळाल्याने हा पक्ष गटापुरता मर्यादित झाला आहे. पक्षाची ही स्थिती लक्षात घेत काही काळापूर्वी राज ठाकरे यांनी संघटनात्मक पातळीवर बदल केले. आता जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे पुन्हा संघटनउभारणीवर भर देत आहेत.

त्यातच आता मराठी पाट्यांच्या मुद्यावर जिल्हाध्यक्ष पवार यांनी खळ्ळखट्याकचा इशारा दिला आहे. सध्या राज्यात टोकाची राजकीय स्पर्धा सुरू झाली असून, राज ठाकरेंच्या मनसेला सत्तेच्या सारीपाटात पुढे जाण्याची संधी आहे.

याची सुरूवात किमान नाशिकमध्ये शंभर टक्के मराठी पाट्या करून होऊ शकते. बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न मोठे आहेत. राज ठाकरे (Raj Thackeray) यासंबंधाने बोलतात आणि बोलतील. पण स्थानिक पातळीवर विरोधकांवर मात करण्यासाठी असे मुद्दे आक्रमकतेने कधी हाताळतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(Edited By- Ganesh Thombare)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT