Udayanraje Bhosale : ...महाराष्ट्राचा पुढचा कारभार फडणवीसांना हातात घ्यावा लागणार : उदयनराजेंचं सूचक विधान

Devendra Fadnavis : कराड येथे आयोजित कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.
Udayanraje Bhosale
Udayanraje BhosaleSarkarnama
Published on
Updated on

Karad News : देवेंद्र फडणवीस यांचे कराडमध्ये आल्यानंतर बैलगाडीतून जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी फडणवीसांनी बैलांचा कासरा हातात घेत बैलगाडी चालवली. आता देवेंद्र फडणवीसांना राज्याचा कासरा (कारभार) हातात घ्यावा लागणार आहे, अशी राजकीय टोलेबाजी करीत असताना पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार असल्याचे राज्यसभा खासदार आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सूचक विधान केले आहे.

कराड येथे आयोजित कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन आज बुधवारी (ता. 17 जानेवारी) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यापूर्वी उपमुख्यमंत्री फडणवीस आणि खासदार उदयनराजे भोसले हे बैलगाडीतून प्रदर्शनस्थळी आले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Udayanraje Bhosale
Karmala Political : 'आदिनाथ' वाचवण्यासाठी रणजितसिंह मोहिते-पाटलांचा पुढाकार...

कराड येथे कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी छत्रपती उदयनराजे भोसले बोलत होते. ते म्हणाले, मोदींनी सिंचनासाठी जे निर्णय घेतले ते वाखाणण्याजोगे आहेत. शेतकरी सधन झाला तरच पूरक व्यवसाय मोठे होतील, त्यासाठी शेतकरी स्वयंपूर्ण होईल, असे पाहावे.

काँग्रेसचे नेते बुद्धिमान, महान होते

काँग्रेसच्या इंदिरा गांधी, चंद्रशेखर राव, प्रतिभाताई असे अनेक नेते महान आणि बुद्धिमान होते. परंतु वंचित आणि गोरगरीब यांच्यासाठी त्यांनी घोषणा केल्या. मात्र, सर्व प्रत्यक्षात आणण्याचे काम मोदींनी केले.

Udayanraje Bhosale
Devendra Fadnavis : कराडमध्ये फडणवीस - उदयनराजेंचा बैलगाडीतून प्रवास...

उदयनराजे म्हणाले, रिझर्व्हमध्ये ठेवू नका

डॉ. अतुल भोसले यांनी कराडच्या छत्रपती शिवाजी स्टेडियमसाठी निधी देऊन रणजी सामने खेळवले जावेत. या रणजी मॅचमध्ये टीमचे कॅप्टन म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी यावे. मात्र, या टीममध्ये मला घ्यावे. मला आता रिझर्व्हमध्ये ठेवू नका, असे मंत्रिपदावरून सूचक वक्तव्य छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले.

राज्यात 45 नव्हे, 48 खासदार महायुतीचे...

राज्यात भाजप, शिंदे आणि अजित पवार गट एकत्र लोकसभा निवडणूक लढल्यास विरोधात कोणताही उमेदवार असला तरी महायुतीचे 45 नव्हे, तर 48 खासदार निवडून येणार आहेत. कोणीही आता महायुतीला रोखू शकत नाही, असा विश्वास छत्रपती उदयनराजे यांनी व्यक्त केला.

Edited By : Rashmi Mane

R...

Udayanraje Bhosale
Devendra Fadnavis : 'मुंबईमध्ये काही रेडे मोकाट सुटलेत त्यांना...', देवेंद्र फडणवीसांच्या टार्गेटवर संजय राऊत

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com