MP Amol Bhagre criticism of fertilizer price increase Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Price Hike Fertilizers: खासदार भगरेंचा भाजपला टोला; रासायनीक खतांच्या दरवाढी विरोधात केंद्र सरकारला दिला इशारा!

Farmers protest fertilizer price increase: केंद्रा सरकारच्या खतांच्या दरवाढीची शेतकऱ्यांवर कुऱ्हाड; खते महाग झाल्याने शेतकऱ्यांना दुहेरी फटका.

Sampat Devgire

Bhaskar Bhagre News: केंद्र सरकारने अखेर पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर बोजा टाकला आहे. रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली. त्यामुळे शेतकरी अडचणीत येणार आहेत. यानिमित्ताने विरोधी पक्षांनी व्यक्त केलेली भिती पुन्हा एकदा खरी ठरली आहे.

या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार भास्कर भगरे यांनी केंद्र सरकारला इशारा दिला आहे. शेतमालाच्या किमती कोसळल्या आहेत. त्याबाबत काहीच उपाययोजना होत नाही.

दुसरीकडे केंद्रातील भाजप सरकार सातत्याने शेतकरी विरोधात भूमिका घेते. शेतमालाला भाव नसताना खतांच्या किमती कशा वाढवता? असा प्रश्न त्यांनी केला. या संदर्भात सरकारने तातडीने दरवाढीचा फेरविचार करावा, असे खासदार भगरे म्हणाले.

देशातील शेतकरी सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत असून, १ एप्रिलपासून खतांच्या दरात झालेल्या वाढीमुळे त्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. विविध रासायनिक खतांच्या दरामध्ये प्रति बॅग सुमारे ₹125 ते ₹300 पर्यंत वाढ झाल्यामुळे शेती उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

खासदार भगरे यांनी या प्रश्नाची दखल घेत केंद्रीय रसायन व खत मंत्री  जगतप्रकाश नड्डा यांना पत्र लिहिले.  या प्रश्नात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. 10:26:26, 12:32:16, 20:20:0:13 यांसारख्या प्रमुख खतांच्या दरवाढीचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होत आहे. यासोबतच खत विक्रीमध्ये लिंकिंगची सक्ती केली जात असल्याच्या तक्रारी वाढल्या.

या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. खते विक्री करणाऱ्या सहकारी संस्थांवरही लिंकिंगची सक्ती केली जात असल्याच्या तक्रारी गंभीर आहेत. ही बाब तात्काळ थांबवणे आवश्यक आहे. सहकारी संस्थांवर अशा प्रकारची अट लादल्यास शेतकऱ्यांना योग्य दरात व पारदर्शक पद्धतीने खत उपलब्ध होण्यास अडथळा निर्माण होतो.

नाशिक जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागांमध्ये अलीकडेच झालेल्या गारपीट, वादळी वारा व अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत खतांच्या दरवाढीमुळे शेतकरी अधिकच अडचणीत सापडला असून, भविष्यात खत टंचाईची भीती देखील निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर खतांच्या दरवाढीचा तातडीने पुनर्विचार करून दर कमी करावेत. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खतांवरील अनुदान वाढवावे. खत विक्रीतील लिंकिंग सक्ती तात्काळ बंद करावी. खते विक्री करणाऱ्या सहकारी संस्थांवर लिंकिंगची सक्ती करू नये. यातील दोषींवर कडक कारवाई करावी आणि खतांचा पुरवठा सुरळीत ठेवून टंचाई टाळावी, अशी मागणी खासदार भगरे यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT