Nashik Politics : नाशिकमध्ये भाजपने स्वबळावर निवडणूक लढवत ७२ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. स्पष्ट बहुमत असतानाही भाजपने शिवसेना व राष्ट्रवादीला सत्तेत सहभागी होण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. अशात भाजपच्या प्रस्तावावर शिवसेनेने काही अटी शर्ती ठेवल्या आहेत.
नाशिकमध्ये भाजप स्वबळावर तर शिवसेना व राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष एकत्र निवडणुकीला सामोरे गेले. त्यात भाजपने १२२ पैकी सर्वाधिक ७२ जागांवर आपले नगरसेवक निवडून आणले. भाजपला या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळालं. तर शिवसेनेला २६, राष्ट्रवादी काँग्रेसला तीन जागा मिळाल्या.
राज्यात महायुती सत्तेत आहे मग त्याचपार्श्वभूमीवर नाशिकमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना सत्तेत सहभागी करून घेण्यासाठी भाजपने तयारी दर्शवली आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव भाजप कार्यालयामार्फत प्रदेश कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. शहराध्यक्ष सुनिल केदार यांनी हा प्रस्ताव पाठवल्याची माहिती आहे. नाशिक महापालिकेत भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आम्ही तीन्ही पक्षांनी एकत्र येऊन काम करावे, असे आमचे मत असल्याचं केदार यांनी म्हटलं आहे.
सत्तेत सन्मानपूर्वक सहभाग दिल्यास विचार करु अशी शिवसेना व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांची भूमिका असल्याची माहिती समोर येते आहे. शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसे यांनीही तशाच काही अटी भाजपसमोर ठेवल्या आहेत. सत्तेत सहभागी करुन घेताना सन्मानजनक पदे मिळाली पाहीजे अशी अपेक्षा हेमंत गोडसे यांनी व्यक्त केली आहे. एका खासगी वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.
भाजपकडून सत्तेत सहभागी होण्यासाठी शिवसेनेला प्रस्ताव आलेला आहे त्याचे स्वागत आम्ही करतो असे हेमंत गोडसे यांनी म्हटले आहे. परंतु भाजपने सन्मानपूर्वक आम्हाला सत्तेत सहभागी करुन घ्यावं असं मत सर्व पदाधिकारी व नवनिर्वाचित नगरसेवकांचे आहे. त्यामध्ये मुख्यत्वे जे काही लाभाची पदे आहेत...मग त्यामध्ये सभागृह नेते पद, उपमहापौरपद, काही वर्षांसाठी स्थायी समिती सभापतीपद, त्यानंतर विभागवार सभापती, शिक्षण मंडळ असेल..एकंदरीतच सन्मानजनक पदे मिळाली पाहीजे. पाच वर्षांच्या सत्ताकाळातील सर्व पदांची रचना सन्मानपूर्वक बसवली तर निश्चितच आम्ही सकारात्मक विचार करु असे हेमंत गोडसे यांनी म्हटले आहे.
सध्या तरी केंद्र व राज्यात महायुती आहे म्हणून नाशिक महापालिकेत देखील एकत्रित सत्तेत असावे असे भाजपचे मत आहे. पण सत्तेत सहभागी करुन घेताना सन्मानपूर्वक करुन घ्यावं. सन्मानजनक अशी पदे मिळाली पाहीजे अशी अपेक्षा गोडसेंनी व्यक्त केली आहे. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास मग आम्हाला, लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली तर त्याला पर्याय नाही असही हेमंत गोडसे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आता पुढच्या एक-दोन दिवसात नाशिकमध्ये काय घडामोडी घडतात. शिवसेना सत्तेत राहते की विरोधी बाकावर बसते हे स्पष्ट होणार आहे.
कोणीही अटी शर्ती घालू नये.
निवडून आलेल्या नगरसेवकांच्या बलानुसार विरोधी बाकावर बसले तरी व सत्ताधारी बाकावर बसले तरी तितकीच पदे मिळणार आहे. मग विरोधी बाकावर का बसावे ? जसे राज्यात महायुती व केंद्रात एनडीए म्हणून सर्वजण एकत्र आहोत. तसेच नाशिक महानगर पालिकेत सुध्दा एकत्रित कामकाज करावे असे आमचे मत आहे. तिन्ही पक्षांपैकी कोणीही अटी शर्ती घालू नये.
सुनील केदार.
अध्यक्ष - भाजप नाशिक महानगर जिल्हा.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.