Nashik Politics : नाशिक महापालिकेत भाजपने शिवसेनेला सोबत घेऊन सत्ता स्थापन केली आहे. तर, राष्ट्रवादीने त्यांना बिनशर्त पाठिंबा दिला आहे. भाजपच्या हिमगौरी आहेर-आडके महापौर तर उपमहापौरपदी शिवसेनेचे विलास शिंदे यांची निवड झाली आहे. स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजपचे मच्छिंद्र सानप यांची निवड झाली आहे. मात्र सभागृह नेत्यांची निवड अद्यापही रखडलेली आहे.
महापालिकेत सभागृह नेता हे पद अत्यंत महत्वाचे पद असते. त्यामुळे या पदासाठी ज्येष्ठ नगरसेवकांकडून वरिष्ठांकडे फिल्डींग लावली जात आहे. सभागृहनेते पदाच्या शर्यतीत माजी उपमहापौर गुरमित बग्गा, माजी सभागृह नेते सुधाकर बडगुजर यांचे नाव आघाडीवर आहे.
परंतु असे असताना मात्र आता या पदासाठी नेत्याची नियुक्ती करताना मुंबई व पुणे महापालिकेचा पॅटर्न राबविला जाण्याची शक्यता व्यक्त केली जाऊ लागली आहे. या पॅटर्ननुसार पक्षात नवीन नगरसेवकांना किंवा गटनेत्यांनाच सभागृहनेते पदी निवडण्याच्या सुप्त हालचाली सुरू झाल्या आहेत.
एकीकडे नाशिक महापालिकेत सभागृहनेते पदी निवड करताना उच्चशिक्षित, नवीन चेहऱ्यांना अर्थात नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांना संधी देण्याचे प्रयत्न आहे. तर दुसरीकडे मुंबई व पुणे महापालिकेत राबविण्यात आलेला गटनेत्यालाच सभागृह नेते पदी नियुक्त करण्याचा पॅटर्न देखील राबविला जाण्याची चर्चा सुरु आहेत. त्यादृष्टीने वरिष्ठांनी सुचना दिल्याचे देखील समजत आहे.
नाशिकमध्येही मुंबई-पुणे पॅटर्न नुसार गटनेत्याची निवड करण्यात आली तर भाजपचे गटनेते ॲड. श्याम बडोदे यांना देखील सभागृहनेते पदाची लॉटरी लागू शकते. परिणामी सध्या रेसमध्ये आघाडीवर असलेली माजी उपमहापौर गुरमित बग्गा, माजी सभागृह नेते सुधाकर बडगुजर यांची नावे मागे पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच सभागृहनेतेपदाचे नाव जवळपास निश्चित झाले असून महापौरांकडे नावाची यादी आल्याचे देखील बोलले जात आहे. त्यामुळे सभागृहनेतेपदावर नक्की कुणाला संधी मिळते याकडे नाशिकच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष्य लागून आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.