Nashik Municipal Deputy Mayor Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Deputy Mayor : नाशिकमध्ये महापौरपद महिलेला, उपमहापौर पदासाठी भाजप नगरसेवकांनी धरला वेगळाच हट्ट

Nashik Municipal Mayor : नाशिक महापालिकेचे महापौरपद हे सर्वसाधरण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेच्या महापौर पदाच्या खूर्चीवर महिलाच विराजमान होणार हे फिक्स झाले आहे.

Ganesh Sonawane

Nashik Politics : नाशिकमध्ये ७२ जागा जिंकत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवल्याने महापौर भाजपचाच होणार हे स्पष्ट आहे. त्यात नाशिकचे महापौरपद सर्वसाधरण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने महापौर पदाच्या खूर्चीवर महिलाच बसणार हेही स्पष्ट आहे. महापौर व उपमहापौर निवडीचा मुहुर्तही ठरला असून ३० व ३१ जानेवारीला महापौर-उपमहापौर निवडप्रक्रिया पार पडणार आहे.

नाशिकच्या महापौर पदासाठी स्थायी समितीच्या पहिल्या व माजी सभापती हिमगौरी आहेर-आडके, दीपाली गणेश गिते, स्वाती भामरे, डॉ. दीपाली कुलकर्णी यांच्यासह डॉ. योगिता हिरे, चंद्रकला धुमाळ यांची नावे चर्चेत आहेत. नाशिकमध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याची धुरा यशस्वीपणे पेलवू शकेल अशा महिला नेतृत्वाची निवड पक्षाला करावी लागणार आहे.

महापौर पदाबरोबरच उपमहापौर व स्थायी समिती सभापतिपदासाठी फिल्डिंग लावली जात आहे. कारण, महापौर निवडीच्या विशेष महासभेतच उपमहापौरपदाची घोषणा केली जाणार आहे. त्याचबरोबर विरोधी पक्षाकडून गटनेते पदासाठी देखील मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. दरम्यान, महापौर पद हे महिलांसाठी राखीव झाले असल्या कारणाने उपमहापौर पद हे पुरुष नगरसेवकाला मिळावे असा हट्ट भाजप नगरसेवकांनी धरल्याची माहिती पुढे येत आहे.

नाशिक महापालिकेत सध्या महिलाराज अवतरले आहे. १२२ पैकी ६७ जागांवर महिला निवडून आल्या आहेत. नाशिक महापालिकेच्या आयुक्त महिला आहेत. अतिरिक्त आयुक्त महिला आहेत. शिवाय आता महापौरही महिला होणार असल्याने महापालिकेत आता महिला राज सुरु होणार आहे. त्यामुळे उपमहापौरपद देखील महिलेलाच मिळेल असा मतप्रवाह आहे. त्यापार्श्वभूमीवर किमान उपमहापौरपद तरी पुरुष नगरसेवकाला मिळावे अशी मागणी पुढे येत आहे.

दरम्यान, महापालिकेचे सहा विभाग आहे. त्यात महापौरपद ज्या विभागाला जाईल, त्या विभागातील उपमहापौर व स्थायी समिती सभापती दिला जाणार नसल्याचे बोलले जात आहे. पद वाटपात भौगोलिक समतोल साधण्याची भाजपची भूमिका असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अन्य विभागांमध्ये पदांचे वाटप होणार असल्याचे बोलले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT