Girish Mahajan : विरोधी पक्षातील दहा नगरसेवक भाजपच्या संपर्कात, गिरीश महाजनांच्या दाव्याने नाशिकमध्ये खळबळ

Girish Mahajan’s claim of TEN opposition councillors in contact with BJP : नाशिकमध्ये विरोधी पक्षातील दहा नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचा दावा मंत्री महाजन यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.
Girish Mahajan on Uddhav Thackeray and Sanjay Raut
Girish Mahajan on Uddhav Thackeray and Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : नाशिक महापालिका निवडणुकीत 122 पैकी ७२ जागा निवडून आणत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. त्यामुळे नाशिकमध्ये भाजपचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. नाशिकमध्ये भाजपचाच महापौर बसणार हेही निश्चित आहे. असे असतानाच भाजपकडे विरोधी पक्षातील दहा नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केला असून त्यामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

नाशिकचे महापौरपद भाजपच्याच वाट्याला येणार असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले आहे. नाशिकमध्ये भाजपने स्वबळावर निवडणुक लढवली होती. भाजपने प्रतिसाद न दिल्याने मित्र पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गटाने युती करुन निवडणुकीला सामोरे गेले. भाजप 122 पैकी ७२ जागांसह सर्वांत मोठा पक्ष ठरल्याने महापौरपदावर भाजपचा दावा निर्विवाद झाला आहे. तर शिवसेना २६ व राष्ट्रवादी काँग्रेसला ४ जागा मिळाल्या आहेत.

त्यामुळे नाशिकमध्ये आपल्या मित्रपक्षांना भाजप सत्तेत आपल्यासोबत घेणार का हा सवाल असताना त्यावरही महाजन यांनी भाष्य केलं. सत्तास्थापनेत महायुतीतील घटक पक्षांना सामावून घेण्याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील, असे स्पष्ट करत त्यांनी हात काढता घेतला.

महापौर पदाची लॉटरी कुणाला?

दरम्यान महापालिका निवडणुकीत भाजपची सत्ता आणण्याचे श्रेय जाणाऱ्या मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे महापौर पदासाठी लॉबिंग होण्याची शक्यता आहे. आचच्या आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष आहे. आगामी कुंभमेळा नाशिकमध्ये होणार असल्याने पक्षाचा चेहारा व नेतृत्व महत्वाचे राहणार असल्याने त्यादृष्टीने महापौर पदावर कुणाला बसवायचं याचा विचार होऊ शकतो. त्यामुळे महापौर पदाची लॉटरी कुणाला लागणार याकडे भाजपच्या निवडून आलेल्या सर्व ७२ नगरसेवकांचे लक्ष्य आहे.

Girish Mahajan on Uddhav Thackeray and Sanjay Raut
Girish Mahajan : कुंभनगरी नाशिकच्या ध्वजवंदनाचा मान गिरीश महाजन यांनाच, मग दादा भुसेंना कुठे पाठवलं?

कुणीही फिल्डिंग लावलेली नाही

दरम्यान नाशिकचा महापौर हा भाजपचाच होणार असल्याचं महाजन यांनी स्पष्ट केलं आहे. पण त्याचवेळी महापौरपदासाठी नवनिर्वाचित नगरसेवकांपैकी अद्याप कुणीही फिल्डिंग लावलेली नाही. मला एकही नगरसेवक भेटलेला नाही. इतकेच नव्हे तर एकही दावेदार मला घ्यायला आला नाही असा दावा महाजन यांनी केला आहे.

Girish Mahajan on Uddhav Thackeray and Sanjay Raut
MLA Suhas Kande : राजकारणात शब्दाला किंमत! एकमेव नगरसेवक असूनही भाजपसाठी सुहास कांदेंचा मोठा निर्णय

ते दहा नगरसेवक नक्की कुणाचे?

नाशिकमध्ये विरोधी पक्षांचा विचार केल्यास शिवसेना (उबाठा)- १५, काँग्रेस- ३ मनसे- १, अपक्ष- १ असे नगरसेवक निवडून आले आहेत. यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला भोपळाही फोडता आलेला नाही. मग अशात नक्की महाजन यांच्या संपर्कात असलेले ते दहा नगरसेवक कोण कोण आहेत आणि कोणत्या पक्षाचे आहेत यावर राजकीय वर्तुळात जोरदार खल रंगला आहे. दरम्यान विरोधी पक्षात सर्वाधिक जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या असल्याने पक्षात खळबळ उडाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com