Dada Bhuse, CM Devendra Fadanvis & Girish Mahajan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik NMC : नाशिकमध्ये शिवसेना सत्तेत बसल्यास गेम फिरणार, वाटाघाटीत भाजपच्या हातून 'हे' महत्वाचे पद निसटण्याची शक्यता

Nashik Municipal Corporation : मुंबईत पाठिंबा देण्याच्या मोबदल्यात शिवसेना नाशिकमध्ये सत्तेत वाटा मागू शकते अशी शक्यता राजकीय जाणकारांनी व्यक्त केली आहे. तसे झाल्यास महत्वाच्या पदांवर वाटाघाटी होऊ शकते.

Ganesh Sonawane

Nashik Politics : नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने स्वबळावर लढत देत ७२ जागा जिंकल्या असून भाजपला स्पष्ट बहुमत आहे. भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी नाशिकमध्ये कुणाचीही आवश्यकता नाही. मात्र असे असतानाही मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला सत्तेत सोबत घ्यायचे किंवा नाही यावर सध्या दोन्ही पक्षांमध्ये अंतर्गत खल सुरु आहे.

एकीकडे, नाशिक महापालिका निवडणुकीत निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी सांभाळलेले संकटमोचक मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घ्यायचे की नाही, याचा निर्णय पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर चर्चा करूनच घेतला जाईल असे यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

तर दुसरीकडे, मुंबईत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला शिवसेनेच्या पाठिंब्याची गरज आहे. मुंबई मनपाच्या निकालात 89 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. पण बहुमतासह सत्ता स्थापन करण्यासाठी महायुतीतील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील 29 जागांची साथ भाजपला लागणार आहे. त्यामुळे मुंबईत पाठिंबा देण्याच्या मोबदल्यात शिवसेना नाशिकमध्ये सत्तेत वाटा मागू शकते अशी सध्या चर्चा सुरु आहे.

नाशिकमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे महापौर हा भाजपचाच होणार हे स्पष्ट आहे. मात्र, शिवसेना भाजपसोबत सत्तेत आल्यास वाटाघाटी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवसेना भाजपसोबत सत्तेत आल्यास भाजपला महापौरपद व शिवसेनेला उपमहापौरपद दिले जाऊ शकते. याशिवाय स्थायी सभापतीपदासह विषय समिती सभापतीपदांचीही वाटणी होऊ शकते.

त्यामुळे नाशिकमध्ये शिवसेना विरोधी बाकावर बसते की सत्तेत सहभागी होते याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे. शिवसेना सत्तेत बसल्यास वाटाघाटी होऊन भाजपच्या हातून उपमहापौरपद निसटण्याची शक्यता आहे. ते शिवसेनेला द्यावे लागू शकते. मुंबईत महापौरपद भाजपकडे राहिल्यास नाशिकमध्ये सेनेला उपमहापौर, स्थायी समिती सदस्य, प्रभाग समित्या आणि विषय समित्यांवरील पदांवर तडजोड मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मुंबईतील सत्तासमिकरणाचा प्रभाव नाशिकमध्ये पडण्याची शक्यता आहे.

भाजपने दिला नव्हता प्रतिसाद

नाशिकमध्ये भाजपने स्वबळावर शंभर हुन अधिक नगरसेवक निवडून आणण्याचा नारा दिला होता. त्यात भाजपमध्ये इच्छुकांची संख्या अधिक होती. त्यामुळे भाजपने नाशिकमध्ये स्वबळावर निवडणूक लढवली. भाजपने युतीसाठी प्रतिसाद न दिल्याने शिवसेना व राष्ट्रवादीने येथे युतीची घोषणा केली होती. पंरतु भाजप ७२ जागांसह सर्वांत मोठा पक्ष ठरल्याने महापौरपदावर भाजपचा दावा निर्विवाद झाला आहे. तर शिवसेनेला २६ व राष्ट्रवादी कॉंग्रेसला ४ जागांवर यश मिळाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT