Sameer Bhujbal, Ajit Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Election : अजितदादांच्या दोन बुलंद तोफा आजारपणामुळे थंड, प्रचाराची सगळी भिस्त एकट्या समीर भुजबळांच्या खांद्यावर

Chhagan Bhujbal & Manikrao Kokate : राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ तसेच माजी आमदार माणिकराव कोकाटे या दोघांनाही प्रकृतीच्या कारणास्तव नाशिकमध्ये प्रचारासाठी सहभागी होता आलेले नाही.

Ganesh Sonawane

Nashik Politics : महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे सहा दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे प्रचाराला वेग आला आहे. नाशिकमध्ये भाजप स्वबळावर लढत असून राष्ट्रवादी-शिवसेना युती झाली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने ३९ उमेदवार रिंगणात उतरविले आहेत.

परंतु असे असताना महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन दिग्गज नेत्यांना प्रकृतीच्या कारणास्तव प्रचारापासून दूर रहावे लागले आहे. यात यंदा राष्ट्रवादीची बुलंद तोफ मंत्री छगन भुजबळ आणि माजी मंत्री माणिकराव कोकाटे या दोघांनाही प्रचारात सहभागी होता आलेले नाही. त्यामुळे प्रचाराची संपूर्ण भिस्त माजी खासदार समीर भुजबळ यांच्या खांद्यावर आलेली आहे.

शिवसेनेचा नाशिकमध्ये जोरदार प्रचार सुरु आहे. बुधवारी (ता. ७) खासदार श्रीकांत शिंदे हे स्वत:नाशिकमध्ये येऊन गेले. त्यांच्या उपस्थितीत मोठी रॅली काढण्यात आली. शिवसेनेचे मंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे यांच्यासह अनेक स्थानिक दिग्गज नाशिकच्या रिंगणात प्रचारासाठी उतरले आहेत. तर भाजपनेही चांगली कंबर कसली असून निवडणूक प्रभारी गिरीश महाजन हे नाशिकमध्येच तळ ठोकून आहेत.

असे असताना राष्ट्रवादीचे दिग्गज नेते भुजबळ व कोकाटे हे मात्र आजारी असल्याने त्यांना प्रचारासाठी प्रत्यक्षात मैदानावर उतरता आलेले नाही. आजवर मंत्री भुजबळ एकहाती प्रचाराची धुरा सांभाळत आले आहे. परंतु आता मंत्री भुजबळ यांच्यावर नुकतीच ह्दयशस्त्रक्रिया झाल्याने त्यांना प्रचाराची दगदग सहन होण्यासारखी परिस्थिती नाही. नुकतेच ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने नाशिकमध्ये आले होते. पण त्यानंतर ते पुन्हा मुंबईला रवाना झाले.

उरले मंत्री नरहरी झिरवाळ मात्र ते शहरात प्रचारासाठी फारसे उपलब्ध नसल्यामुळे सर्व मदार एकट्या समीर भुजबळ यांच्यावर आल्याचे चित्र आहे. पक्षाचा 'स्ट्राईक रेट' चांगला कसा राहिल, यादृष्टीने समीर भुजबळांना प्रयत्न करावे लागणार आहेत. पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या अनुपस्थितीत पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचे समीर भुजबळ यांच्यासमोर आव्हान राहील.

राष्ट्रवादीचे नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे सात आमदार आहेत. यामध्ये त्र्यंबक–इगतपुरी मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर यांच्या कन्येने पंचवटी प्रभागातून महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. त्यामुळे झिरवाळ यांना तिकडे लक्ष द्यावे लागत आहे. तर, नाशिकरोडला देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली असून कार्यकर्त्यांसाठी लढावे लागत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT