

Nashik Politics : महापालिकेच्या एकुण लढतींपैकी प्रभाग क्रमांक ५ ड मधील लढत ही उत्कंठापूर्ण राहील असे दिसते आहे. या गटात माजी महापौर अशोक मुर्तडक हे शिवसेना पुरस्कृत तर भाजपचे उमेदवार व माजी उपमहापौर गुरमित बग्गा यांच्यात लढत होत आहे.
२०१५ मध्ये मनसेच्या सत्ता काळात मुर्तडक महापौर तर बग्गा उपमहापौर राहिले आहेत. मनसेच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट प्रत्यक्षात अमलात आणण्याची जबाबदारी दोघांवर होती. परंतु, आता दोघेही वेगवेगळ्या पक्षाकडून निवडणूक लढवत आहे. विशेष म्हणजे दोघांची सहावी निवडणूक आहे.
माजी महापौर अशोक मुर्तडक पूर्वाश्रमीचे एकसंघ शिवसेनेचे पदाधिकारी होते. मखमलाबाद नाका, क्रांती नगर भागातून त्यांनी पाच वेळा नेतृत्व केले आहे. एकसंघ शिवसेनेकडून चारदा नगरसेवक होते. त्यानंतर मनसेत प्रवेश केला. मनसेच्या सत्ता काळात २०१५ मध्ये मुर्तडक महापौर बनले. मनसेचे प्रदेश सरचिटणीस पदावर असताना त्यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहा महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रभाग सहा ऐवजी त्यांना प्रभाग पाच मधून निवडणूक लढवायची होती. भाजपने ऐनवेळी त्यांची उमेदवारी कापल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी केली.
नंतर शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून त्यांचे नाव जाहीर करण्यात आले. दोन दिवसांपूर्वी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षात अधिकृत प्रवेश केला. त्यांची लढत त्यांच्याच महापौर पदाच्या कार्यकाळात उपमहापौर राहिलेले गुरमित बग्गा यांच्याशी होत आहे. बग्गा पूर्वाश्रमीचे कॉंग्रेस नेते होते. चारदा थेट जनतेतून निवडून आले तर एकदा स्विकृत नगरसेवक म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बग्गा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
भाजपच्या दोन आमदारांची कसोटी
प्रभाग क्रमांक सात ड गटातील निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष आहे. त्याला कारण म्हणजे भाजपकडून दुसऱ्यांदा निवडणूक लढविणारे माजी नगरसेवक योगेश हिरे यांची लढत शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते यांच्यासमोर होत आहे. जनसंघापासून भाजप वाढीसाठी झटणारे स्व. पोपटराव हिरे यांचे चिरंजीव असलेले योगेश यांची निवडणूक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांच्यासाठी देखील महत्त्वाची आहे. पूर्वाश्रमीचे भाजप नेते व सध्या एकसंघ शिवसेना ते एकनाथ शिदे यांच्या शिवसेनेचे उपनेते असलेले अजय बोरस्ते यांच्याशी हिरे यांची लढत होणार आहे. याच प्रभागात मध्य च्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांचे वास्तव्य आहे. भाजपचा संपूर्ण पॅनल निवडून आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यामुळे दोन आमदाराची कसोटी या गटात लागणार आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या प्रभागात बोरस्ते पुन्हा बाजी मारणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.