Nashik Politics : एबी फॉर्म पळवापळवीच्या गोंधळात नाशिकमध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार अनधिकृत ठरले आहेत. याउलट शिवसेना ठाकरे गटातून भाजपमध्ये आलेल्या सुधाकर बडगुजर यांना चार एबी फॉर्म मिळाले. त्यांच्या एकाच घरात तीन जणांना तिकीट मिळालं आहे. त्यामुळे सुधाकर बडगुजर यांच्याविरोधात पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार सीमा हिरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे तक्रार केली आहे.
एबी फॉर्म चोरण्यात आल्याचा आरोप सीमा हिरे यांनी केला आहे. पक्षातील गैरप्रकारामुळे निष्ठावंतांवर अन्याय झाला असून त्यांना एबी फॉर्म मिळवण्यासाठी अडणींना सामोरे जावे लागले. दुसरीकडे एकाच घरात तीन उमेदवारी आणि हातात १० एबी फॉर्म कुणामुळे मिळाले. या मागे कोण आहेत याची चौकशी व्हावी अशी मागणी सीमा हिरे यांनी केली आहे.
एकाचवेळी दोन एबी फॉर्म दिल्याने मुकेश शहाणे यांच्यासह पक्षाच्या चार अधिकृत उमेदवारांचे एबी फॉर्म अग्राह्य धरले गेले. तर सुधाकर बडगुजर यांच्यासह त्यांची पत्नी व मुलगा अशा तिघांना पक्षाच्या चिन्हावर उमेदवारी मिळाल्याने भाजपत वादळ उठलं आहे. सीमा हिरे या प्रकारानंतर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट त्यांच्याकडे या प्रकरणाची तक्रार केली आहे. या गैरप्रकाराला लगाम घालून तोडगा काढण्याची विनंती हिरे यांनी केली आहे.
सीमा हिरे यांचे म्हणणे आहे की, भाजपमध्ये हे असे पहिल्यांदाच घडत आहे. एकाच घरात तीन उमेदवाऱ्या आणि एकाच्याच हातात ८ एबी फॉर्म जातात. भाजप हा शिस्तीचा पक्ष आहे पण बडगुजर पक्षात आल्यानंतर शीस्त मोडल्याचं हिरे याचं म्हणणं आहे. कारण २०१७ मध्ये शिवसेनेत असताना एबी फॉर्मसंदर्भात बडगुजर यांना असाच प्रकार केला होता आणि आता भाजपत येऊन त्यांनी त्याचीच पुनरावृत्ती केल्याचा आरोप सीमा हिरे यांनी केला आहे.
दुर्लक्षाची पुनरावृत्ती
निष्ठावंताना न्याय देण्याची मागणी सीमा हिरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्षांकडे केली आहे. परंतु बडगुजर यांच्या भाजपप्रवेशालाही सीमा हिरे यांनी कडाडून विरोध केला होता. मंत्री गिरीश महाजन ऐकत नव्हते म्हणून सीमा हिरेंनी त्यावेळीही फडणवीस यांचा दरवाजा ठोठावला होता. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. सीमा हिरेंचा विरोध झुगारुन वाजत गाजत महाजन यांच्या आशीर्वादाने बडगुजर यांचा भाजप प्रवेश झालाच होता. त्यामुळे यावेळेलाही आता एबी फॉर्मच्या गोंधळाबाबत बडगुजरयांच्याविषयी केलेल्या तक्रारीची दखल मुख्यमंत्री कितपत घेतात हे पाहावे लागणार आहे. मुख्यमंत्री या प्रकरणाविषयी मंत्री गिरीश महाजन यांच्याशी बोलून तोडगा काढतील की बडगुजर प्रवेशावेळी सीमा हिरेंच्या तक्रारीकडे जसे दुर्लक्ष केले त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा होते हे पाहावे लागेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.