Chhagan Bhujbal : छगन भुजबळ बरे झाले, ह्रदय शस्त्रक्रियेनंतर प्रथमच नाशिकमध्ये येणार; येताच करणार 'हे' पहिले महत्वाचे काम

Chhagan Bhujbal Nashik visit : भुजबळांवर ह्रदय शस्त्रक्रिया झाल्याने ते मुंबईतील निवासस्थानी उपचार घेत आहे. नगरपालिका निवडणुकही त्यांच्या अनुपस्थितीत झाली. तब्बल दोन महिन्यांनंतर ते आता नाशिकमध्ये येणार आहेत.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. मध्यंतरी त्यांच्यावर ह्रदय शस्त्रक्रिया झाल्याने ते मुंबईत डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत होते. त्यामुळे येवला नगरपालिका निवडणुकीतही त्यांना प्रत्यक्ष मैदानावर येऊन सहभाग घेता आला नाही. भुजबळांच्या अनुपस्थितीतच येवल्याची निवडणूक झाली. परंतु आता भुजबळांची प्रकृती उत्तम असून ते लवकरच नाशिकमध्ये येणार आहेत.

नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला मंत्री छगन भुजबळांची मोठी कमतरता जाणवली. त्यांच्या जागी माजी खासदार समीर भुजबळ यांनी पालिका निवडणुकीची धूरा आपल्या खांद्यावर घेतली. त्यात समीर भुजबळांना मोठं यशही आलं. येवल्यात राष्ट्रवादी व भाजप युतीचा नगराध्यक्ष झाला. येवल्याचा गड राखण्यात भुजबळ यशस्वी झाले. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी भुजबळांनी हॉस्पिटलमधूनच ऑनलाइन येवलेकरांशी संवाद साधला होता. रुग्णालयात असतानाच त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना फोन करुन येवल्यात भाजप-राष्ट्रवादीची युती घडवून आणली. आजारी असतानाही भुजबळांनी हॉस्पिटलमधून निवडणुकीची रणनिती आखली होती.

आता शनिवार (दि. ३) जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने मुंबई नाका येथील स्मारकात अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ह्रदय शस्त्रक्रिया झाल्यानंतर गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीनंतर मंत्री छगन भुजबळ हे जयंती उत्सवाच्या निमित्ताने अभिवादन करण्यास या सोहळ्यास उपस्थित राहणार आहे. त्यांच्या या नाशिक दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणि सकारात्मक ऊर्जा संचारली आहे.

Chhagan Bhujbal
Jalgaon Municipal Election : जळगाव महापालिकेत भाजपपाठोपाठ शिवसेनेनेही खाते उघडलं ; आमदारपुत्र बिनविरोध नगसेवक

मंत्री भुजबळ हे नाशिकला जाण्यापूर्वी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले यांच्या नायगाव जि.सातारा या जन्मगावी होणाऱ्या जयंती उत्सव सोहळ्यास उपस्थित राहणार आहे. नायगाव येथील कार्यक्रम झाल्यानंतर ते दुपारी २ वाजता नाशिकच्या मुंबई नाका येथील स्मारकात उपस्थित राहून अभिवादन करणार आहे. यावेळी त्यांच्या समवेत माजी खासदार समीर भुजबळ,आमदार पंकज भुजबळ यांच्यासह अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रमुख नेते पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे.

मंत्री भुजबळ हे नाशिकला जाण्यापूर्वी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले यांच्या नायगाव जि.सातारा या जन्मगावी होणाऱ्या जयंती उत्सव सोहळ्यास उपस्थित राहणार आहे. नायगाव येथील कार्यक्रम झाल्यानंतर ते दुपारी २ वाजता नाशिकच्या मुंबई नाका येथील स्मारकात उपस्थित राहून अभिवादन करणार आहे. यावेळी त्यांच्या समवेत माजी खासदार समीर भुजबळ,आमदार पंकज भुजबळ यांच्यासह अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रमुख नेते पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे.

Chhagan Bhujbal
Raj-Uddhav Thackeray: 'बाहेरुन आलेल्या ठाकरेंनाही महाराष्ट्रानं...'; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदांचं धक्कादायक विधान

शस्त्रक्रियेनंतर प्रथमच जनतेत येत असल्याने, हा दौरा पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकासाठी भावनिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. नाशिक आणि येवला परिसरातील नागरिक, कार्यकर्ते, महिला, युवक आणि विविध समाजघटकांनी भुजबळ साहेबांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केल्या होत्या. आज त्यांच्या सुदृढतेसह नाशिकमध्ये आगमनामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणि सकारात्मक ऊर्जा संचारली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com