Shivaji Gangurde, Sameer Kamble, Shahu Khaire, ganesh more Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Election : शिवाजी गांगुर्डे की समीर कांबळे? शाहू खैरे की गणेश मोरे? चुरशीच्या लढतीत कोण मारणार मैदान?

Nashik municipal election : प्रभाग १२ मध्ये भाजपचे शिवाजी गांगुर्डे विरुद्ध शिवसेनेचे समीर कांबळे व प्रभाग १३ मध्ये भाजपचे शाहू खैरे विरुद्ध शिवसेनेचे गणेश मोरे अशी चुरशीची लढत होणार आहे.

सरकारनामा ब्युरो

Nashik Municipal Election : केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीतील घटक पक्ष भाजप व शिवसेना प्रभाग १२ मध्ये आमने-सामने आहेत. त्यात ‘ड’ गटातील लढतीकडे नाशिककरांचे लक्ष आहे. सहाव्यांदा निवडणूक लढविणारे भाजपचे शिवाजी गांगुर्डे पुन्हा एकदा मैदानात उतरले असून त्यांची लढत शिवसेनेचे समीर कांबळे यांच्याशी आहे. विशेष म्हणजे दोघेही पूर्वाश्रमीचे कॉंग्रेसचे माजी नगरसेवक आहे. गांगुर्डे यांनी २०१७ मध्ये भाजपमध्ये प्रवेश करून निवडणूक जिंकली होती.

महापालिकेत भाजपची पूर्ण बहुमताने सत्ता आल्यानंतर पक्षात नव्याने प्रवेश केलेल्यांना भाजपने सत्तेची पदे देत पक्षात आलेल्यांना न्याय देण्याची भूमिका बजावली. गांगुर्डे सातत्याने या प्रभागाचे नेतृत्व करत आले आहे. कॉंग्रेसमध्ये त्यांना मोठ्या पदावर काम करण्याची संधी दिली गेली नाही. मात्र, भाजपने पहिल्याच निवडून आल्यानंतर लगेच गांगुर्डे यांच्या गळ्यात स्थायी समिती सभापती पदाची माळ घातली. चार वेळा कॉंग्रेसचे नगरसेवक निवडून आल्यानंतर पाचव्यांदा भाजपकडून निवडून आले.

स्थायी समितीचे दोनदा सभापती राहिलेले उत्तम कांबळे यांनी तब्येतीच्या कारणास्तव राजकारणातून निवृत्ती घेतल्यानंतर मुलगा समीर कांबळे यांच्याकडे धुरा सोपविली. २०१७ मध्ये समीर कॉंग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आले. आता त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचा सामना सहाव्यांदा निवडणूक लढविणारे शिवाजी गांगुर्डे यांच्याशी होणार असल्याने या प्रभागातील मतदार गांगुर्डे की कांबळे यांना प्रतिनिधी म्हणून निवडतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

खैरे की गणेश मोरे?

भाजपमध्ये इच्छुकांच्या मुलाखती सुरु असताना कॉंग्रेसकडून चार वेळा निवडून आलेले व स्थायी समितीचे दोनदा सभापती पद भूषविलेले शाहु खैरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. खैरे यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये नाराजीचा स्फोट झाला. मध्यच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी देखील खैरे यांच्या प्रवेशाला विरोध केला.

अनेक वर्षांपासून खैरे यांच्याशी दोन हात करणारे गणेश मोरे यांनी प्रवेशाला विरोध करताना भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयासमोर आंदोलन केले. आंदोलनाची चर्चा राज्यभर पोचली. मोरे यांनी देखील खैरे यांच्याशी निवडणुकीत पुन्हा दोन हात करण्यासाठी शिवसेनेकडून उमेदवारी करत आहे. प्रभाग 13 ड मधील ही निवडणूक शहरात सर्वात लक्षवेधी ठरत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT