Devendra Fadnavis : देवा भाऊ म्हणतात.. ‘उनको मिरची लगीं, तो मैं क्या करूँ'

Devendra Fadnavis On BJP unopposed wins : नगरपालिका निवडणुकीप्रमाणेच महानगरपालिका निवडणुकीतही प्रत्यक्ष मतदानापूर्वी भाजपचे अनेक ठिकाणी नगरसेवक बिनविरोध झाले आहे. त्यावरुन त्यांनी विरोधकांवर टीकेचा झणझणीत प्रहार केला.
Devendra Fadnavis made a memorable comment “Unko mirchi lage, to main kya karoon” during a public statement
Devendra Fadnavis made a memorable comment “Unko mirchi lage, to main kya karoon” during a public statementSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : महापालिका निवडणुकांच्या निवडणुकांमध्ये सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांनी प्रचारात उडी घेतली आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जळगावसह धुळे दौऱ्यावर होते. त्यांनी दोन्ही ठिकाणच्या महापालिका निवडणुकांचा आढावा घेतला. जळगावात त्यांचा भव्य रोड-शो झाला. धुळ्यातही भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ मोठी सभा झाली.

नगरपालिका निवडणुकीप्रमाणे महानगरपालिका निवडणुकीतही भाजपचे अनेक ठिकाणी नगरसेवक बिनविरोध झाले आहे. परंतु विरोधकांकडून त्यावरुन टीका व आरोप केले जात आहे. त्यावर धुळ्यातील सभेत बोलताना फडणवीस यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.

फडणवीस म्हणाले, धुळे महापालिकेसह राज्यभरात भाजपचे नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याने विरोधकांना चांगलीच मिरची झोंबली आहे. मात्र, ‘उनको मिरची लगीं, तो मैं क्या करूँ’अशा झणझणीत भाषेत त्यांनी विरोधकांच्या टिकेचा समाचार घेतला.

महापालिका निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ धुळ्यात झालेल्या सभेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. ते पुढे म्हणाले, काँग्रेसच्या काळात ३३ खासदार बिनविरोध निवडून आले, तेव्हा लोकशाही जिवंत होती आणि आता भाजपचे नगरसेवक बिनविरोध निवडून आले, तर लोकशाही धोक्यात आली का? असा सवाल उपस्थितीत करत त्यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.

Devendra Fadnavis made a memorable comment “Unko mirchi lage, to main kya karoon” during a public statement
Nashik Election : अजितदादांच्या दोन बुलंद तोफा आजारपणामुळे थंड, प्रचाराची सगळी भिस्त एकट्या समीर भुजबळांच्या खांद्यावर

शहरांच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५० हजार कोटींहून अधिक निधी दिला असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. तसेच देशाच्या GDP मध्ये शहरांचा ६५ टक्के वाटा आहे. मोदी सरकारने अमृत दोन, स्मार्टसिटी आणि घरकुल योजनेच्या माध्यमातून शहरांचा कायापालट केला आहे. शहरी भागातील ३० लाख गरिबांना हक्काची पक्की घरे देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणले असल्याचे ते म्हणाले.

यावेळी भाजपचे मंत्री व संकटमोचक असलेल्या गिरीश महाजन यांचेही कौतुक फडणवीस यांनी केले. महाजन हे राजकारणातला आकडा एकदम 'परफेक्ट' लावतात. मागच्या निवडणुकीवेळी त्यांनी धुळ्याचा आकडा अगदी अचूक लावला होता. आता त्यांनी केवळ धुळ्याचेच नाही, तर इतर ठिकाणचे आकडे लावूनही आम्हाला मदत करावी, असे मुख्यमंत्री म्हणताच सभेत सगळे खळखळून हसले.

Devendra Fadnavis made a memorable comment “Unko mirchi lage, to main kya karoon” during a public statement
Nashik NMC Election : मनसेच्या सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने-सामने, कोण बाजी मारणार याकडे आख्ख्या नाशिकचे लक्ष

लखपती दिदी

फडणवीस यावेळी म्हणाले, सरकारने आता लाडक्या बहिणींना 'लखपती दीदी' बनविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आतापर्यंत तब्बल ५० लाख महिला लखपती झाल्या असून, पुढील चार महिन्यांत आणखी ५० लाख महिलांना लखपती दीदी करीत एक कोटी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे आमचे लक्ष्य असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com