Sudhakar Achwal Winchester New Mayor 2025 : सामाजिक आणि जनतेच्या प्रश्नांवर काम करून कुठेही आपला लौकिक वाढाविता येतो. समाजही त्याची दखल घेत. याची प्रचिती सुधाकर अचवल या नाशिकच्या सुपुत्राने दाखवून दिले आहे. त्यामुळे नाशिककरांना अभिमान वाटावा अशी कामगिरी त्यांनी करून दाखवली.
गेली पंधरा वर्षे मँचेस्टरचे कौन्सिलर (नगरसेवक) असलेल्या सुधाकर अचवन यांची नुकतीच शहराच्या महापौरपदी नियुक्ती झाली आहे. गेली पंधरा वर्षे ते नगरसेवक म्हणून शहराच्या विविध कामकाजात आणि प्रशासकीय प्रक्रियेत आपल्या ठसा उमटवला होता. त्याची दखल नागरिक आणि प्रशासनाने घेतली. १४ मेस शहराचे महापौर म्हणून त्यांची नियुक्ती झाली.
सुधाकर अच्वल (Sudhakar Achwal) १९९७ मध्ये इंग्लंडला परतले. याच सुमारास त्यांनी विंचेस्टर येथे आपल्या कामाला सुरुवात केली. सामाजिक आणि धर्मदाय उपक्रमांमध्ये त्यांनी पुढाकार घेतला होता. अशा विविध कामकाजातून त्यांनी प्रेमातून शहरासाठी अनेक उपक्रम राबविले. त्याला जनतेतूनही चांगला प्रतिसाद मिळाला.
या सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होतानाच सुधाकर अच्युअल यांनी राजकारणातही भूमिका पार पाडले. गेली पंधरा वर्षे ते शहराचे कौन्सिलर (नगरसेवक) म्हणून कार्यरत आहेत. या कामाचे दखल म्हणूनच पुढील एक वर्षासाठी त्यांची महापौर पदासाठी निवड करण्यात आली आहे. नाशिकच्या एका सुपुत्राने मोठ्या यशाला गवसणी घातली आहे.
मँचेस्टर शहराचे विविध प्रश्न आहेत. प्रदूषण हा गंभीर विषय बनला आहे. त्यासाठी पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जागृती या माध्यमातून प्रदूषणाच्या समस्येचे नियम निवारण करण्याचा करणार असल्याचे त्यांनी. या संदर्भात सामाजिक दायित्व म्हणून निधी संकलन करण्याचा त्यांचा मानस आहे. बॉलीवुड नाईट आणि तत्सम एक क्रमांकाच्या माध्यमातून प्रदूषण संपविण्यासाठी निधी संकलन करू, असे ते म्हणाले.
नाशिकच्या पेठे विद्यालयात प्राथमिक व माध्यमिक शिक्षण आणि आरवायके महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी मुंबईत पदवीत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर १९७३ मध्ये ते इंग्लंडला संशोधनासाठी गेले.त्यानंतर विविध देशांमध्ये नोकरी केली. त्यानंतर त्यांनी इंग्लंडमध्ये अध्यापन सुरू केले. १९८० मध्ये त्यांचा मँचेस्टर येथील व्हिव्हियन यांच्याशी विवाह झाला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.