Manikrao Kokate Ajit Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Manikrao Kokate : काँग्रेसच्या 'ऑफर'चा धुरळा बसत नाही, तोच मंत्री कोकाटेंनी फोडला बाॅम्ब; म्हणाले, 'अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत'

Nashik NCP Minister Manikrao Kokate Ajit Pawar Chief Minister : नाशिकचे एनसीपी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Pradeep Pendhare

Maharashtra Politics : काँग्रेसचे नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट मुख्यमंत्रि‍पदाची ऑफर दिली. आमच्याकडे या, तुम्हाला आम्ही पाठिंबा देतो, असे म्हटले होते. नाना पटोले यांच्या या ऑफरनंतर राज्याच्या राजकारण चांगलेच ढवळून निघाले.

यानंतर नाशिकमधील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कृषि मंत्री माणिक कोकाटे यांनी अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा व्यक्त करत, बाॅम्ब फोडला आहे.

काँग्रेसच्या (Congress) नाना पटोले यांच्या ऑफरचा धुरळा बसत नाही, तोच मंत्री माणिकराव कोकाटे यांनी जाहीरपणे अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत, अशी व्यक्त केलेल्या इच्छेमुळे महायुतीत मित्रपक्षांच्या भुवया उंचवल्या आहेत. विशेष करून भाजपला मिरची झोंबण्याची शक्यता आहे.

मंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले, "आमची अपेक्षा आहे की, अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत. कोणत्या पक्षाच्या नेत्यांना, मंत्र्यांना वाटणार नाही की, आमचे प्रमुख नेते अजितदादांनी (Ajit Pawar) मुख्यमंत्री व्हावे नाही म्हणून! आमच्या सर्वांची अपेक्षा आहे की, अजितदादांनी या राज्याचे मुख्यमंत्री व्हावे." राज्यातील जनतेने दादांच्या पाठीशी उभं राहावं, अशी आमची मनापासून धारणा आहे, असेही मंत्री कोकाटे यांनी म्हटले.

आमदारकीच्या अपात्रच्या मुद्यावर बोलताना माणिकराव कोकाटे म्हणाले, 'न्यायालयाने निकाल दिलेला आहे. स्थगिती दिली आहे. विरोधक आणि मीडियाकडून तेच-तेच सुरू आहे. न्यायालयाच्या निकालावर संशय घेणे मूर्खपणा आहे. आता राजकीय षडयंत्र सुरू झाली आहे.'

साखर कारखान्यांच्या मदतीची मागणी

राज्यातील साखर कारखाने सध्या तोट्यात आहेत. राज्यातील तब्बल दोनशेच्यावर कारखान्यांनी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. त्यावर मंत्री माणिकराव कोकाटे यांनी कारखाने सध्या तोट्यात चालले आहेत, त्यामुळे त्यांनी मदतीची केलेली मागणी योग्यच आहे. आम्ही हार्वेस्टरची स्किम आणत आहोत. त्यामुळे लेबरच खर्च कमी होईल. हार्वेस्टरच्या माध्यमातून कारखान्यांना काही प्रमाणात बळकटी मिळेल, असा विचार आम्ही कृषी खात्याच्या माध्यमातून करत आहोत, असे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT