Rupali-Chakankar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Rupali Chakankar Politics: राजीनामा दिला, मात्र अडचणी संपलेल्या नाहीत, यामुळे रूपाली चाकणकरांना पोलीस बजावू शकतात नोटीस!

Nashik NCP Rupali Chakankarl captain Ashok Kharat police investigation-वादग्रस्त तांत्रिक कॅप्टन अशोक खरात यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीची होत आहे खातरजमा

Sampat Devgire

Captain Ashok Kharat Investigation: वादग्रस्त तांत्रिक कॅप्टन अशोक खरात प्रकरणाचा तपास वेग घेत आहे. त्याच्या सहकाऱ्याकडे सापडलेल्या पेन ड्राईव्हमध्ये असलेल्या व्हिडिओ क्लिप्सबाबत खातरजमा केली जात आहे. त्यातील अन्य महिलांची माहिती पोलीस घेत आहेत. 

वादग्रस्त तांत्रिक कॅप्टन अशोक खरात यांनी महिलांचे शोषण केले. महिला अत्याचार प्रकरणी एका महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. त्यासाठी येत्या २४ मार्च पर्यंत कॅप्टन खरात पोलीस कोठडीत आहे. 

कॅप्टन खरात याच्याशी जवळीक राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांना महागात पडली आहे. प्रचंड टीका झाल्याने त्या अडचणीत आल्या. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर शुक्रवारी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे कॅप्टन खरात कुटुंबीयांशी निकटचा संपर्क होता. त्याबाबतची अनेक छायाचित्रे आणि माहिती समाज माध्यमांवर विरोधकांनी व्हायरल केली. त्यामुळे आता हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. 

विरोधकांच्या टिकेमुळे महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा चाकणकर यांनी दिला. मात्र राजीनामा देऊनही त्यांच्या अडचणी संपलेल्या नाहीत. कॅप्टन अशोक खरात यांच्या तपासासंदर्भात पोलीस श्रीमती चाकणकर यांना नोटीस बजावू शकतात, असे सूत्रांनी सांगितले.  

महिला अत्याचार प्रकरणी कॅप्टन खरात याचा ऑफिस बॉय नीरज जाधव सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्याकडील पेन ड्राईव्ह मध्ये ५८ वादग्रस्त चित्रफिती आढळले आहेत. मात्र यातील अन्य कोणतीही महिला तक्रारीसाठी पुढे आलेली नाही. 

या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कॅप्टन खरात यांनी जमलेली मालमत्ता आणि कोट्यावधी रुपयाचे ईशान्येश्वर मंदिर त्याच्याशी संबंधित माहिती संकलित केली जात आहे. श्रीमती चाकणकर या मंदिराच्या विश्वस्त होत्या. त्यामुळे कॅप्टन खरात याच्या तपासाला गती देण्यासाठी श्रीमती चाकणकर यांना पोलीस तपासात सहकार्य करण्यासाठी बोलाविले जाऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे राजीनामा दिला तरी श्रीमती चाकणकर यांच्या अडचणी पूर्णपणे सुटलेल्या नाहीत. 

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT