Bhaskarrao-Bhagare  Bhaskarrao-Bhagare
उत्तर महाराष्ट्र

Bhaskarrao Bhagare: प्रवाशांच्या खिशावर एसटीचा हल्ला; खासदार भगरे एसटीच्या 'NCMC' कार्ड सक्तीवर संतापले!

Nashik NCP Sharad Pawar MP Bhaskar Bhagre Angry ST Bus NCMC Card compulsion -राज्य शासनाचा नागरिकांवर दुहेरी हल्ला कशासाठी, एकीकडे सवलती दुसरीकडे छुपी वसुली ही तर जनतेची फसवणूक

Sampat Devgire

MSRTC Card News: एसटी प्रवाशांना एमसीएमसी कार्ड सक्ती करण्यात आली आहे. अचानक केलेली ही सक्ती म्हणजे प्रवाशांच्या सवलतींवर कात्री लावण्याचा प्रकार आहे. त्यामुळे ही शक्ती कशासाठी असा प्रश्न करण्यात आला आहे. 

या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार भास्कर भगरे यांनी संतप्त प्रश्न केला आहे. राज्य शासन आधार आणि अन्य प्रमाण उपलब्ध असताना नवे अडथळे कशासाठी निर्माण करीत आहे. हे प्रकार ताबडतोब थांबवा, असे खासदार भगरे म्हणाले. 

यासंदर्भात खासदार बकरे यांनी राज्याचे मुख्य सचिव आणि राज्य परिवहन महामंडळाच्या आयुक्तांना पत्र लिहिले आहे. शासनाकडून एकीकडे ज्येष्ठ नागरिक, महिला यांना सवलती जाहीर केल्या जातात. या सवलतींना मागच्या दाराने कपातीचा हा नवा फंडा तर नाही ना? 

महिला, ज्येष्ठ नागरिकांच्या सवलतीचा मार्ग तांत्रिक अडचणींनी अडवू नका. एकीकडे सवलती जाहीर करून लोकप्रियता मिळवायची. मतदारांना निवडणुकीत आमिष दाखवायचे आणि दुसरीकडे त्यांची अशी अडवणूक करायची हे थांबवावे, असे खासदार भगरे म्हणाले.

एसटी बस प्रवासातील महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या सवलतीसाठी एनसीएमसी कार्डची सक्ती केल्याने राज्यभर निर्माण झालेला गोंधळ तातडीने दूर करून ही सक्ती रद्द करावी. महिलांना एसटी बसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, सवलतीचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्यात आल्याने या योजनेच्या अंमलबजावणीतच अडथळे निर्माण झाले आहेत.

ऐन गणेशोत्सवाच्या काळात एसटी बसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी असताना अनेक ठिकाणी संगणकीय प्रणाली बंद पडणे, एनसीएमसी कार्डांचा तुटवडा, कार्ड उपलब्ध होण्यास विलंब तसेच कार्डमध्ये रक्कम भरण्याच्या प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. सवलतीसाठी पात्र महिला किंवा ज्येष्ठ नागरिक प्रत्यक्ष बसमध्ये उपस्थित असतानाही केवळ एनसीएमसी कार्ड उपलब्ध नसल्यामुळे त्यांना सवलतीचा लाभ नाकारला जात असल्याच्या तक्रारी आहेत.

“लाभार्थी महिला प्रत्यक्ष बसमध्ये उपस्थित असताना तिची पात्रता स्पष्ट आहे. केवळ कार्ड नसल्याच्या कारणावरून तिला सवलतीपासून वंचित ठेवणे हा सवलतीच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासणारा प्रकार आहे. एनसीएमसी कार्डची व्यवस्था सुरळीत होईपर्यंत त्याची सक्ती करू नये,” अशी भूमिका खासदार भगरे यांनी मांडली.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT