Nashik NMC Election Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik NMC Election : नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंची साथ सोडलेले बडगुजर, बोरस्ते दोघे हॅप्पी, भाजप सोडून मनसेत आलेल्या पाटलांचाही मार्ग मोकळा

Sudhakar Badgujar, Dinkar Patil, Ajay Boraste : नाशिक महापालिका निवडणुकीसाठी ३१ प्रभागांमधील १२२ जांगासाठी आरक्षण सोडतीची हंडी काल फुटली. यात अनेक दिग्गज माजी नगरसेवकांचे प्रभाग सुरक्षित राहिले आहे.

Ganesh Sonawane

Nashik Politics : नाशिक महापालिका निवडणुकीसाठी ३१ प्रभागांमधील आरक्षण सोडत मंगळवारी महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. महापालिका निवडणुकीच्या आरक्षण सोडतीत अनेक प्रभागात मर्जिप्रमाणे आरक्षण निघाल्याने काही इच्छुक सुखावले तर काही जणांना धक्का बसला आहे. काहींवर निवडणुकीसाठी दुसऱ्या प्रभागात स्थलांतरित होण्याची नामुष्की आली आहे. मात्र शंभराहून अधिक माजी नगरसेवकांना दिलासा मिळाला असून त्यात अनेक दिग्गजांचे प्रभाग हे सुरक्षित राहिले आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून भाजपमध्ये गेलेले सुधाकर बडगुजर, भाजपमधून मनसेत गेलेले दिनकर पाटील, शिवसेनेच्या विभागनीनंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले अजय बोरस्ते यांच्यासह भाजपच्या माजी महापौर रंजना भानसी, सतीश कुलकर्णी, अशोक मुर्तडक, शिवसेनेचे स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव निमसे, शिवाजी गांगुर्डे, शाहू खैरे, प्रवीण तिदमे, गजानन शेलार, डॉ. हेमलता पाटील, प्रथमेश गिते, सलीम शेख, विलास शिंदे, हिमगौरी आहेर-आडके, दिनकर आढाव, शिवसेना (उबाठा) चे जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी या दिग्गजांचे प्रभाग सुरक्षित राहिले.

महापालिका निवडणुकीत भाजपने शंभर प्लसचा नारा दिला आहे. त्यादृष्टीने भाजपने मोठे इनकमिंग घडवून आणले. त्यासाठी आपल्याच आमदारांचा विरोध डावलून भाजपच्या वरिष्ठांनी काही मात्तबर नेत्यांना पक्षात प्रवेश दिला. त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून भाजपमध्ये आलेले सुधाकर बडगुजर यांचाही समावेश होतो. त्यांच्याही प्रभाग क्रं २५ मध्ये आरक्षण जैसे थे राहिल्याने त्यांचा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला असून त्यांना पक्षात घेण्याचा भाजपचाही उद्देश साध्य झाला.

विधानसभेला उमेदवारी मिळाली नाही म्हणून भाजपचे दिनकर पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत मनसेत प्रवेश केला व पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मनसेच्या तिकीटावर त्यांनी विधानसभेचे निवडणूक लढली. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला. आता प्रभाग क्रंमाक ९ मधून त्यांचा महापालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. दिनकर पाटील यांच्यासह अमोल पाटील, लता पाटील, माजी महापौर दशरत पाटील यांचे चिरंजीव प्रेम पाटील येथून लढण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे पाटील विरुद्ध पाटील असा सामना येथे बघायला मिळू शकतो.

तर माजी विरोधी पक्षनेते व शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते यांनी प्रभाग क्रं ७ मध्ये प्रतिनिधित्व केले होते. त्यांच्यासह भाजपच्या स्थायी समितीच्या माजी सभापती हिमगौरी आडके, स्वाती भामरे, योगेश हिरे यांचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, या ठिकाणी आता महायुती होते की भाजप व शिवसेना समोरासमोर लढतात हे पाहावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT