Vilas Shinde, Ajay Boraste, Dinkar Patil, Seema Heere, Devyani Farande Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik NMC Election : नाराजीनाट्य संपलं.. आमदार देवयानी फरांदेंचे पुत्र, सीमा हिरेंची मुलगी, दिनकर पाटलांकडून अर्ज दाखल

Nashik Municipal Election : नाशिकमध्ये महायुतीच्या घटक पक्षांमध्ये जागावाटप किंवा युती संदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, मात्र भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केले जात आहे.

Ganesh Sonawane

Nashik Politics : नाशिक महापालिका निवडणुकीत महायुतीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. महायुती होणार की नाही हेही अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र असे असताना भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची लगबग सुरु झाली आहे. सोमवार (दि. २९) अनेक प्रमुख नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी विभागीय कार्यालय परिसर राजकीय हालचालींनी गजबजून गेला होता. 

नाशिकमध्ये महायुतीची घोषणा झाली नसली तरी सोमवारी प्रमुख नेत्यांसह इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये प्रभाग क्रंमाक तेरा मध्ये झालेल्या विरोधी पक्षातील नेत्यांच्या भाजप प्रवेशाला कडाडून विरोध केलेल्या आमदार देवयानी फरांदे या देखील नाराजीनाट्य शांत झाल्यानंतर महापालिकेच्या रिंगणात उतरल्या आहेत. देवयानी फरांदे यांचा मुलगा अजिंक्य फरांदे यांनी प्रभाग क्रमांक ७ मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी संपूर्ण फरांदे कुटुंब उपस्थित होते.

दरम्यान चार दिवसांपूर्वी मनसेला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये घरवापसी केलेल्या दिनकर पाटील यांनी प्रभाग क्रमांक ९ मधून भव्य रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केला. हेच दिनकर पाटील मनसेमधील इच्छुकांच्या मुलाखती घेत होते. दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीनंतर त्यांनी जल्लोष करत डान्स केला होता. पेढे वाटले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तेच दिनकर पाटील भाजपच्या कमळावर स्वार झाल्याने अनेकांना धक्का बसला.

तसेच शिवसेना शिंदे गटाचे संपर्कप्रमुख विलास शिंदे यांनी मोटरसायकल रॅलीद्वारे शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केला. तसेच शिवसेना शिंदे गटाचे उपनेते अजय बोरस्ते यांनी देखील निवडणुकीसाठी शड्डू ठोकला आहे. बोरस्ते यांनी प्रभाग क्रमांक ७ मधून उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच इंदुबाई नागरे यांनीही मोठ्या कार्यकर्त्यांच्या जथ्यासह उमेदवारी अर्ज भरला.

तसेच नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांनीही त्यांची मुलगी रश्मी बेंडाळे-हिरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तसेच दीर माजी नगरसेवक योगेश (मुन्ना) हिरे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. सीमा हिरे यांच्या समर्थकांनी यावेळी घोषणाबाजी करत शक्ती प्रदर्शन केल्याचं पाहायला मिळालं. याशिवाय माजी आमदार अपूर्व हिरे यांच्या पत्नी योगिता हिरे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT