Devyani Pharande : देवयानी फरांदेंच्या डोळ्यात आलं पाणी, गिरीश महाजनांपुढे झाल्या हतबल..

Nashik political News : मंत्री गिरीश महाजन यांनी आमदार देवयानी फरांदे यांचा विरोध झुगारुन आज काही नेत्यांना भाजपत प्रवेश दिला. त्यामुळे देवयानी फरांदे यांनी नाराजी व्यक्त केली. जे झालं ते मला आवडलं नाही असं त्यांनी म्हटलं.
girish mahajan, Devyani Pharande
girish mahajan, Devyani PharandeSarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : नाशिक महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात आज भाजपमध्ये मोठा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष व मनसेच्या अनेक दिग्गज नेत्यांनी आज भाजपची वाट धरली. यातील काही जणाच्या पक्षप्रवेशाला भाजपच्या निवडणूक प्रमुख व आमदार देवयानी फरांदे यांचा विरोध होता. परंतु फरांदे यांचा विरोध झुगारुन मंत्री महाजन यांनी त्यांना पक्षात प्रवेश दिला

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी महापौर विनायक पांडे, यतीन वाघ, कॉंग्रेसचे शाहू खैरे व मनसेचे दिनकर पाटील यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. यातील माजी महापौर विनायक पांडे, यतीन वाघ व कॉंग्रेसचे शाहू खैरे यांच्या पक्षप्रवेशाला देवयानी फरांदे व त्यांच्या समर्थकांनी विरोध केला. भाजप कार्यालयाबाहेर फरांदे समर्थकांनी मंत्री गिरीश महाजनांना घेराव घातला. महाजनांसमोर फरांदे समर्थकांनी घोषणाबाजी करत या प्रवेश सोहळ्याला विरोध दर्शवला.

परंतु महाजन यांनी आमदार देवयानी फरांदे व त्यांच्या समर्थकांचा विरोध झुगारुन या सर्वांना पक्षात अधिकृत प्रवेश दिला. त्यामुळे आमदार देवयानी फरांदे दुखावल्याचे पाहायला मिळाली. माध्यमांशी बोलताना त्या भावूक झाल्या होत्या. त्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं दिसलं.

girish mahajan, Devyani Pharande
Devyani Pharande : देवयानी फरांदेंनी उठवलं रान ; यतीन वाघ, विनायक पांडे अन् शाहू खैरेंच्या भाजप प्रवेशाला कडाडून विरोध

देवयानी फरांदे म्हणाल्या, मध्य विधानसभेची आमदार म्हणून माझं मत होतं की, प्रभागात एक अतिशय सक्षम उमेदवार बबलू शेलार यांचा भाजप प्रवेश झाला होता. आणि आमचे उर्वरित जे सगळे उमेदवार होते त्यांना व पक्षाच्या कार्यकर्त्यांना घेऊन.. एक बबलू शेलार आणि पक्षाचे तीन असे मिळून पॅनल केला असता तर शंभर टक्के ते निवडले जाणार होते असं लोकप्रतिनिधी या नात्याने माझं मत होतं. बाकी माझा कुणाच्या पक्षप्रवेशाला विरोध करण्याचे कारण नाही.

गेल्या चाळीस वर्षात मी स्वत:साठी कधीही जाहीर भूमिका घेतली नाही. पक्षाची मी निष्ठावन कार्यकर्तेी आहे. पक्षाच्या निष्ठावान पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पाठबळ देण्यासाठी मी सकाळी सोशल मीडीयावर या पक्षप्रवेशाला माझा विरोध आहे अशी पोस्ट टाकली. दरम्यान हे बोलताना देवयानी फरांदे यांना गहिवरुन आलं होतं. त्या म्हणाल्या मी पक्षाची सर्वसामन्य कार्यकर्ती आहे. माझ्या डोळ्यासमोर जर कार्यकर्त्यांचा बळी दिला जात असेल तर हे मला बरोबर वाटलं नाही.

girish mahajan, Devyani Pharande
Nashik Politics : नाशिकध्ये ठाकरे बंधूंना भाजकडून मोठा धक्का, ठाकरेंच्या दोन माजी महापौरांना लावलं गळाला

जे आज पक्षात आले आहे त्यांचे पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी म्हणून स्वागत करते पण जे काही आज घडलं ते मला काही आवडलेलं नाही. मला कुणी कोंडीत पकडायचं असेल त्यांनी पकडावं मी कुणाला घाबरत नाही. तसेच मी गिरीश महाजन साहेबांवर नाराज नाही. त्यांना चुकीच्या पद्दतीने ब्रीप केलं गेलं आहे. काही दलाल आहेत त्यांना वाटतं आपल्याच घरात सगळी तिकीटं मिळावी या स्वार्थातून हे राजकारण झालेलं असल्याचं त्या म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com