Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP Nashik Politics: शिंदे- पवारांनी लढवली शक्कल, फाटाफुटीच्या भीतीने जागावाटप टाळत प्रभाग वाटप केले

Nashik NMC Election : भाजपने अजित पवारांना जागा दाखवली, महापालिका निवडणुकीत युती लांबच, चर्चाही टाळली!

Sampat Devgire

NCP- Shivsena News : महापालिका निवडणुकीत सुरुवातीपासून आत्मविश्वासाने उतरलेल्या भाजपने सहकाऱ्यांना त्यांची जागा दाखवली. महापालिकेत अपेक्षेप्रमाणे भाजप स्वबळावर निवडणुकीत उतरणार आहे. त्याचा फटका महायुतीच्या सहकाऱ्यांना बसला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीत महायुतीची घोषणा केली होती. त्यामुळे शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष जोरदार मोर्चे बांधणी करीत होता. निरुत्साही राष्ट्रवादी काँग्रेस देखील भाजपच्या भरवशावर होता.

नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत मात्र हे सर्व डाव उलटे पडले आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी गेले वर्षभर जोरदार फिल्डिंग लावली होती. महायुतीतील अनेक प्रबळ माजी नगरसेवकांना भाजप प्रवेश देण्यात आला होता. शेवटच्या टप्प्यात जोरदार इनकमिंग झाल्याने भाजपने अपेक्षेप्रमाणे सहकाऱ्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. शिवसेना शिंदे पक्षाशी तीन ते चार दिवस युतीची बोलणी सुरू ठेवली. शेवटच्या दिवशी त्यांना नकार देण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची महापालिका निवडणुकीसाठी फारशी तयारी नव्हती. महायुती होणार या एकमेव अपेक्षेवर पक्षाचे पदाधिकारी आस लावून होते. त्यासाठी त्यांनी अक्षरशा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे मनधरणी केली. मात्र या सगळ्यांचा काहीही उपयोग झाला नाही. शेवटच्या टप्प्यात महायुतीतील हे दोन्ही उपेक्षित पक्ष राजकीय गरज म्हणून एकत्र आले आहे. मात्र मतांची फटाफट आणि एकमेकांवरील अविश्वास यामुळे गोंधळाची स्थिती होती. यावर या पक्षाच्या नेत्यांनी शक्कल लढवली आहे.

मंत्री नरहरी झिरवाळ आणि माजी खासदार समीर भुजबळ यांनी काल महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेला जवळ करण्याचा निर्णय घेतला. एकत्र येण्याचा निर्णय झाला तरी परस्परांवर विश्वास नसल्याचे चर्चेतून दिसून आले. या पक्षांनी जागावाटप न करता थेट प्रभागांची वाटणी केली आहे. एक प्रभागातील सर्व चार उमेदवार एकच पक्षाचे असतील असा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे शेवटच्या दिवशी भुजबळांचे अनेक कट्टर समर्थक शिवसेनेत दाखल झाले. शिवसेनेच्या इच्छुकांनी गरज म्हणून राष्ट्रवादीत प्रवेश केला.

आता एका प्रभागात सर्व चार उमेदवार शिवसेना शिंदे पक्षाचे किंवा राष्ट्रवादीचे असतील. त्यामुळे सर्व उमेदवारांना एकच चिन्ह असेल. त्यातून कार्यकर्त्यांची फाटा फूट आणि मत विभागणी टाळण्याचा प्रयत्न आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या या प्रभाग वाटपाने इच्छुकांनाही दिलासा मिळाला आहे. त्याचा फायदा शिवसेना शिंदे पक्षाला होण्याची चिन्हे आहेत. मात्र मर्यादित संघटन असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला त्याचा फटका बसू शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT