Girish Mahajan News: नाशिक महापालिका निवडणुकीत भाजप स्वबळावर निवडणुकीला सामोरे जात आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची चर्चा शेवटच्या क्षणी फिसकटली. त्यामुळे महापालिका निवडणुकीत बहुरंगी लढत होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती व्हावी अशी इच्छा व्यक्त केली होती. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी याबाबत प्रयत्न केले. नाशिकमध्ये युती व्हावी यासाठी मंत्री महाजन यांची तयारी होती.
शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष गेल्या वर्षभर आक्रमक रणनीती राबवत होता. त्यांनी विविध पक्षांतील माजी नगरसेवकांना प्रवेश दिले होते. त्यामुळे शिवसेना शिंदे पक्षावर उमेदवारीसाठी इच्छुकांचा प्रचंड दबाव होता.
या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांच्यासोबत झालेल्या चर्चेत शिवसेनेने ५० तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने ३५ जागांची मागणी केली होती. यामध्ये चर्चेत शिवसेनेने ३५ आणि राष्ट्रवादी काँग्रेस २५ जागांवर ठाम थांब राहिले. या स्थितीत भाजपने सहकारी पक्षांची मागणी मान्य केल्यास त्यांची कोंडी होणार होती.
नाशिकमध्ये महायुतीबाबत भाजपने दोन्ही सहकारी पक्षांची चर्चा सुरू ठेवली होती. मात्र शेवटच्या क्षणी महायुती फिस्कटली. महायुती न होण्याचे कारण आता गिरीश महाजन यांनी सांगितले आहे.
महायुतीच्या चर्चेत प्रारंभी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातर्फे माजी खासदार समीर भुजबळ आणि मंत्री नरहरी शिरवळ यांनी भाग घेतला. त्यांचा तडजोड करण्याचा इरादा होता. मात्र प्रारंभीच ३५ जागांची मागणी करून त्यांनी कोंडी करण्याचा प्रयत्न केला.
भारतीय जनता पक्षाकडे ७८ माजी नगरसेवक होते. विरोधी पक्षांना कमकुवत करण्यासाठी त्यांनी अनेक नेत्यांना उमेदवारीचे आश्वासन दिले होते. त्याच बोलीवर या नेत्यांनी भाजप प्रवेश केला होता.
महायुती झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला 35 जागा हव्या होत्या. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला ५० जागा हव्या होत्या. ८५ जागा सहकारी पक्षांना दिल्यास भाजपकडे किती जागा राहिल्या असत्या? असा प्रश्न महाजन यांनी केला.
भाजपकडे ७८ माजी नगरसेवक आणि एक हजार ६६ इच्छुक उमेदवार होते. या सगळ्यांनी मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन करून महाजन यांच्यावर दडपण आणले होते. या स्थितीत गिरीश महाजन स्वतःच दडपणाखाली आल्याचे चित्र पाहायला मिळाले.
सहकारी पक्षांनी महायुतीची इच्छा व्यक्त केली होती. मात्र त्याची चर्चा सुरू होण्यास विलंब झाला. शेवटच्या टप्प्यात त्यावरून महायुतीत तणाव निर्माण झाला. त्यातूनच भाजपने स्वबळावर निवडणूक करण्याचा निर्णय घेतला, असे मंत्री महाजन म्हणाले.
-------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.