Nashik Election: "नवीन कार्यकर्त्यांना डावलता येत नाही", जुन्या कार्यकर्त्यांवर भडकले गिरीश महाजन; गोंधळ घालणाऱ्यांची करणार चौकशी

Nashik Election : महाराष्ट्रातील सर्वच महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया आज पूर्ण झाली. यावेळी अनेक निष्ठावंतांना तिकीटं न मिळाल्यानं ते नाराज झालेले पाहायला मिळाले यातूनच बराच गोंधळही झाला.
Girish Mahajan
Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

Nashik Election : नाशिक महापालिकेत आज उमेदवारी अर्ज भरताना बराच गोंधळ पाहायला मिळाला. जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी न दिल्यानं त्यांनी आपल्या नेत्यांसमोर चांगलाच गोंधळ घातला. अनेकांना अश्रू अनावर झाले होते, तर काहीजण थेट मुद्द्यांवरुन गुद्द्यांवर आलेले दिसले. नाशिकमध्ये भाजपच्याबाबतीत ही बाब मोठ्या प्रमाणावर दिसून आली. पण यावर भाष्य करताना नाशिक महापालिकेचे निवडणूक प्रभारी आणि मंत्री गिरीश महाजन यांनी गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना चांगलीच तंबी दिली.

Girish Mahajan
Pune Politics: धंगेकर म्हणतात युती तुटली अन् सावंत म्हणतात नाही; पुण्यात शिवसेनेनं नेमका काय घोळ घातला?

पक्षात मोठ्या आशेनं आलेल्या आणि त्यांच्याबाबत काही कमिटमेंट ठरलेल्या असल्यानं त्यांना तिकीटं द्यावी लागतात. पण याला मोठ्या प्रमाणावर विरोध करताना गोंधळ घालणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांची चौकशी केली जाईल, असा इशाराही गिरीश महाजन यांनी दिला आहे. त्यामुळं आता नाशिकमध्ये तिकीटं मिळवण्यासाठी तसंच तिकीट न मिळाल्यामुळं आक्रमक झालेल्या जुन्या कार्यकर्त्यांवर पक्षांतर्गत कारवाई देखील होऊ शकते.

Girish Mahajan
Andekar Vs Komkar: आंदेकरांच्या कुटुंबाला राष्ट्रवादीने तिकीट देताच कोमकरही रिंगणात! नाना पेठेत दोन्ही गँग पुन्हा भिडणार

महाजन नेमकं काय म्हणाले?

गिरीश महाजन म्हणाले, "नाशिक महापालिकेसाठी तिकीटं १२२ आहेत, या तिकीटांचं सगळ्यांनाच वाटप झालं पाहिजे हे बघावं लागतं. त्यामुळं ही सर्व तिकीटं आम्हालाच भेटली पाहिजेत (जुन्या कार्यकर्त्यांना) असंही करता येणार नाही. यामध्ये काही नवीन आलेले कार्यकर्ते हे अपेक्षेनं आलेले असतात. त्यांचं काही कमिटमेंट होतं. त्यामुळं मला असं वाटतं की, हा गोंधळाचा प्रकार होताच कामा नये अशा प्रकारे हातघाईवर येणं हे चुकीचं आणि दुर्देवी आहे.

Girish Mahajan
Mahapalika Election News: धक्कादायक! भाजपनं मुलीला तिकीट नाकारताच आईला आला हार्ट अटॅक; मिरा-भाईंदरमध्ये राजकारण पेटलं

हा चुकीचा प्रकार आहे, असं होताच काम नये. म्हणजे बी फॉर्म देताना इथं शंभर दीडशे लोक येतात. इतके तिकडे मारामाऱ्या भानगडी करतात, हे अतिशय अयोग्य आहे. निश्चित याबाबतीत चौकशी देखील केली जाईल आणि कोण याला खतपाणी घालत होतं? कोण प्रमुख कार्यकर्ते होते? यासंदर्भात चौकशी करुन आम्ही कारवाई करु"

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com