Maharashtra politics Mahavikas Aghadi division: शिवसेना आणि मनसेसह महाविकास आघाडी तयार झाली. या आघाडीचे जागावाटप झाले. मात्र या जागा वाटपाला इच्छुक उमेदवार महत्त्व देईनाचे झाले आहेत.
शिवसेना उद्धव ठाकरे आणि मनसे यांसह काँग्रेस राष्ट्रवादीचा समावेश महाविकास आघाडीत झाला आहे. या चारही पक्षांचे जागावाटप झाले. मात्र इच्छुकांनी जमेल तिथे उमेदवारी अर्ज दाखल केल्याने नवा पेच उभा राहिला आहे.
या संदर्भात जागावाटपाप्रमाणे उमेदवारांना माघार घेण्यास सांगण्यात यावे. यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. यामध्ये मनसे राज ठाकरे पक्षाच्या इच्छुकांची संख्या मोठी होती.
महाविकास आघाडीचे जागावाटप झाले तरी उमेदवारी देताना मात्र गोंधळ वाढला आहे. पक्षाने दिलेले उमेदवार आणि प्रभाग स्तरावर उमेदवारांची सोय यात मोठी तफावत आहे. अनेक उमेदवारांनी प्रभाग स्तरावर सोयीचे पॅनल केले आहे. त्याने महाविकास आघाडीत मोठी बिघाडी झाली आहे.
या संदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांची चार तास खलबते झाली. मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अनेक उमेदवारांनी नाशिक रोड भागात अर्ज दाखल केले आहेत. त्यांना अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकावा यावरून नेत्यांमध्ये खटके उडाले.
विशेषता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बहुतांश माजी नगरसेवक भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात गेले आहेत. शिल्लक राहिलेल्या मोजक्या नेते आणि कार्यकर्त्यांना सांभाळून घेणे नेत्यांची हतबलता आहे. या हतबलतेमुळे महाविकास आघाडी कागदावरच राहते की काय? अशी स्थिती आहे.
भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने बहुतांशी प्रभागांमध्ये प्रबळ उमेदवार दिले आहेत. उमेदवारांना सर्व प्रकारची रसद पुरवली जात आहे. या स्थितीत प्रत्येक प्रभागात प्रबळ उमेदवार उभे करण्यात महाविकास आघाडीची शक्ती खर्च होत आहे.
महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये कोणाला माघार घेण्यास सांगावे यावर एकमत नाही. आज माघारीचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे कोणते बंडखोर माघार घेतात यावर महाविकास आघाडीचे अस्तित्व ठरणार आहे. त्या दृष्टीने सर्वच नेते कामाला लागले आहेत. काँग्रेसच्या बंडखोर आणि अनधिकृत उमेदवारांची माघार होईल असा विश्वास खासदार डॉ शोभाताई बच्छाव यांनी व्यक्त केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.