Ashok Kharat News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ashok Kharat News: धक्कादायक! अशोक खरातच्या बोगस खात्यांचे धागेदोरे भाजप नेत्यापर्यंत; पोलिसांची मोठी कारवाई

Ashok Kharat Fake Accounts News: भोंदू खरातच्या बोगस बँक खात्यांचे धागेदोरे भाजप नेत्यापर्यंत पोहोचल्याची चर्चा रंगली आहे. या प्रकरणात नामकर्ण आवारे याला पोलिसांनी अटक केली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Captain Ashok Kharat News: भोंदू कॅप्टन अशोक खरात यांनी कोट्यावधी रुपयांचे बेनामी व्यवहार केल्याचा संशय आहे. यासंदर्भात कोपरगाव येथील समता पतसंस्थेत व्यवहार झाले. ईडीने या खात्यांचा तपास सुरू केला आहे.

कोपरगावचा समता पतसंस्थेपाठोपाठ सिन्नरच्या जगदंबा पतसंस्थेतही 32 बनावट खाती आढळले आहेत. कॅप्टन अशोक खरात याच्यासाठी बँकेच्या संस्थापक नामकर्ण आवारे त्याचा सुत्रधार आहे. आवारे हा सिन्नर सहकारी औद्योगिक वसाहतीचा अध्यक्ष आहे.

बुधवारी सायंकाळी सिन्नर पोलिसांनी भोंदू कॅप्टन खरात याची पोलीस कोठडी मिळवली. या तपासात कुंडेवाडी (सिन्नर) येथील जगदंबा पतसंस्थेत खरात याच्याशी संबंधित 32 बनावट खाती आढळली. त्याचा तपास पोलिसांनी सुरू केला.

औद्योगिक वसाहतीच्या कार्यालयातून आवारे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. आवारे यांनी सुरुवातीला पोलिसांना अजिबात दाद दिली नाही. तो सत्ताधारी पक्षाच्या राज्य उद्योग आघाडीचा पदाधिकारी असल्याचे बोलले जाते.

सिन्नर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात भोंदू खरात यांच्याशी पुन्हा एकदा सत्ताधारी पक्षाच्या राजकीय नेत्याचा संबंध असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नेत्या रूपाली चाकणकर यांचा संबंध खरात यांच्याशी जोडण्यात आला होता. त्यामुळे पोलीस तपासात राजकीय कनेक्शन पुढे येते का? याची उत्सुकता आहे.

जगदंबा पतसंस्थेचा सर्वेसर्वा

खरात याच्यावर कारवाई झाल्यानंतर या खात्यातील रक्कम काढून घेण्यात आल्याचाही संशय आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर बेनामी व्यवहार झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे ईडी कडून त्याची चौकशी होण्याची शक्यता आहे.

या पतसंस्थेतील वादग्रस्त व्यवहार पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर यापूर्वीच फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. संस्थेचा व्यवस्थापक अविनाश कांडेकर याला अटक करण्यात आली होती. त्यामुळे पतसंस्थेचा सर्वेसर्वा आवारे हा पोलिसांच्या रडारवर होता

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT