Nashik Police Crack Down on Drug Network, Rs 1 Crore Drugs Seized Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Police : नाशिक पोलिसांची मोठी कारवाई, राजस्थानमधून तस्कर ताब्यात; एक कोटीचे ड्रग हस्तगत!

Nashik Police Drugs Smuggler : अमली पदार्थ माफिया विरोधात सुरू असलेल्या कारवाई थेट राजस्थानात जाऊन कारवाईने पोलिसांचे कौतुक होत आहे.

Sampat Devgire

Nashik Police News: नाशिक शहरात एमडी ड्रग कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला होता. यामध्ये थेट राजकीय नेत्यांशी लागेबांधे उघड झाले होते. अद्यापही अमली पदार्थांचा सुळसुळाट सुरूच आहे. यासंदर्भात नाशिकच्या गंगापूर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी मोठी कामगिरी केली आहे.

थेट पाकिस्तान सीमेवर जाऊन राजस्थानातून अमली पदार्थ आणि तस्करांना पोलिसांनी ताब्यात घेतले. परराज्यात जाऊन एवढ्या मोठ्या प्रमाणावर कारवाईचा हा पहिलाच प्रकार आहे.

राजस्थानात छापा टाकून ९५.६० लाखांचा एक हजार ९१२ ग्रॅम एमडी ड्रग जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात रफिक खान (वय २३), रोहित मेघवाल (वय २२) आणि शौकत अली (वय २६) या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. संशयित आरोपी हे राजस्थानमधील बाडमेर आणि जोधपूर येथील रहिवासी आहेत.

शहरातील गंगापूर पोलिस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्हात जप्त अमली पदार्थ आणि गुन्हेगारांचा मूळ स्त्रोत शोधताना पोलीस थेट राजस्थान पर्यंत पोहोचले. नाशिकसह महाराष्ट्रात उदयपूर भागातून अमली पदार्थांचा पुरवठा केला जात असल्याचे स्पष्ट झाले. त्यामध्ये गुन्हेगारांची संघटित साखळी कार्यरत होती.

नाशिक शहर पोलिस आणि अमली पदार्थ विरोधी पथकाने संयुक्तपणे राजस्थानात जाऊन ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांच्या तपासानंतर शहरासह अन्यत्र होणारी अमली पदार्थांची तस्करी व त्याचे मूळस्त्रोत याबाबत मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे.

राजकीय लागेबांधे उघड

दोन वर्षांपूर्वी नाशिक येथून एमडी ड्रग्सची निर्मिती होत असल्याचे स्पष्ट झाले होते. याबाबत मुंबईच्या पोलिसांनी थेट कारवाई करून नाशिकच्या पोलिसांना धक्का दिला होता. यासंदर्भात अटक केलेल्या आरोपीचे राजकीय लागेबांधे देखील उघड झाले होते. त्यानंतर वडाळा येथून अटक करण्यात आलेल्या तस्करांचे थेट सत्ताधारी पक्षाशीच संबंध असल्याचे आरोप होते. या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी केलेली ही कारवाई पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT