Sindhudurg Crime : मोठी बातमी! शिवसेनेच्या नेत्याच्या घराबाहेर सापडलं ड्रग्स, पोलिसांनी घेतलं ताब्यात

Sindhudurg Drug Seizure Outside Shiv Sena Leader House : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या सूचना पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्यानंतर पोलिसांकडून विविध भागांत तपासणी मोहीम राबवली जात आहे. अमली पदार्थांची विक्री आणि साठवणूक करणाऱ्या व्यक्तींवर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून, संशयित ठिकाणी पोलिसांकडून सर्च ऑपरेशन केले जात आहे.
Police conduct a drug seizure operation in Shiroda, Sindhudurg, amid intensified action against illegal activities during Ganeshotsav.
Police conduct a drug seizure operation in Shiroda, Sindhudurg, amid intensified action against illegal activities during Ganeshotsav.Sarkarnama
Published on
Updated on

Sindhudurg Drug Seizure : सिंधुदुर्गमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अमली पदार्थांविरोधात पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवला आहे. तर वेंगुर्ला पोलिसांनीतालुक्यातील शिरोडा देऊळवाडी येथे केलेल्या कारवाईत सुमारे ७१० ग्रॅम अमली पदार्थ जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सिद्धेश परब यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

शिरोडा देऊळवाडी परिसरात पोलिसांनी केलेल्या तपासणीदरम्यान एका घराच्या बाहेरील पडवीत बॅग आढळून आली. या बॅगेची झडती घेतल्यानंतर त्यामध्ये गांजा आणि कोकेनसदृश पदार्थ असल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याचे सांगण्यात येत आहे.

एका सत्ताधारी पक्षाशी संबंधित पदाधिकाऱ्याच्या घराच्या परिसरातून अमली पदार्थांचा साठा आढळल्याने या प्रकरणाकडे राजकीयदृष्ट्याही पाहिले जात आहे. मात्र, सिद्धेश परब यांचा या अमली पदार्थांशी नेमका संबंध काय, याबाबत अद्याप तपास सुरू आहे.

अवैध धंद्यांविरोधात पोलिसांची मोहीम

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या सूचना पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्यानंतर पोलिसांकडून विविध भागांत तपासणी मोहीम राबवली जात आहे. अमली पदार्थांची विक्री आणि साठवणूक करणाऱ्या व्यक्तींवर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून, संशयित ठिकाणी पोलिसांकडून सर्च ऑपरेशन केले जात आहे.

Police conduct a drug seizure operation in Shiroda, Sindhudurg, amid intensified action against illegal activities during Ganeshotsav.
Manoj Jarange Patil : उपोषण सुरू असतानाच जरांगेंविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार; थेट ED द्वारे चौकशीची मागणी, बारसकरांचा खळबळजनक आरोप

अशातच शिरोड्यात झालेल्या या कारवाईमुळे पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी मोहिमेला आणखी बळ मिळण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील अवैध व्यवहारांवर नियंत्रण आणण्यासाठी पुढील काळातही अशाच प्रकारच्या कारवाया होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Police conduct a drug seizure operation in Shiroda, Sindhudurg, amid intensified action against illegal activities during Ganeshotsav.
Ashok Kharat Case : राजकीय नेत्यांशी संबंधांचे आरोप; अशोक खरात प्रकरणात अद्याप कारवाई का नाही? यंत्रणांची सहानुभूती मिळाल्याची चर्चा

दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. जप्त केलेला अमली पदार्थ नेमका कुठून आणण्यात आला, त्याचा वापर किंवा वितरण कुठे होणार होते आणि या प्रकरणामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, या दिशेने पोलिसांकडून तपास सुरू आहे. सिद्धेश परब यांच्यावरील आरोप अद्याप तपासाधीन असून, पुढील तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेतून या प्रकरणातील अधिक माहिती समोर येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com