CJP Protest Shivaji Park : आंदोलनाच्याआधीच अभिजीत दीपकेंची कोंडी, शिवाजी पार्कच्या प्रवेशद्वारांवर बॅरिकेडिंग, कडेकोट बंदोबस्त!

CJP Protest Police : आजपासून शिवाजी पार्कवर सीजेपीकडून आंदोलन करण्यात येणार आहे. मात्र, पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे.
CJP Protest Shivaji Park
CJP Protest Shivaji Park sarkarnama
Published on: 
Updated on: 

Abhijit Deepke News : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सीजेपी आजपासून शिवाजी पार्क येथे आंदोलन करणार आहे. मात्र, या आंदोलनाच्या काही तासआधीच सरकारने सीजेपीला मोठा धक्का दिला आहे.

शिवाजीपार्कमध्ये आंदोलनासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मात्र, सीजेपीचे प्रमुख अभिजीत दिपके हे आंदोलनावर ठाम आहे. जंतर मंतरवर झालेल्या सीजेपीच्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला होता, त्यामुळे परवानगी नाकारल्यानंतर पोलिसांकडून आंदोलन येथे येऊ नये म्हणून कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.

शिवाजी पार्कच्या सहाही प्रवेशद्वारांवर बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. नियमित पोलिसांसह साध्या गणवेशातील पोलिसांचा बंदोबस्त येथे आहे. दादर रेल्वे स्थानक परिसरात अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

CJP Protest Shivaji Park
Municipal Politics : महापालिकेत हायव्होल्टेज ड्रामा! निलंबनानंतर महासभेला नगरसेवक हजर, महापौरांनी थेट आदेशच दिले!

ज्ञानेश कुमारांनी राजीनामा द्यावा

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे भाजपला अप्रत्यक्ष मदतीची भूमिका घेत आहेत. त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, त्यांनी आपला राजीनामा द्यावा, असे राजकीच अभ्यासक योगेंद्र यादव यांनी म्हटले आहे. तर, सीजेपी देखील ज्ञानेश कुमार यांना पदावर राहण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले आहे.

CJP Protest Shivaji Park
Cockroach Janata Party Protest: केंद्रीय निवडणूक आयोगाविरुद्ध 'कॉकरोच जनता पार्टी'चा एल्गार! आंदोलनाचे स्थळ अन् तारीखही ठरली

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com