Ashok-kharat-IPS-Tejaswi-Satpute Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ashok Kharat SIT: भोंदू कॅप्टन अशोक खरात प्रकरण; त्रोटक माहिती देत ‘एसआयटी’ने माध्यमांना दिले सल्ले!

Nashik Police SIT Tejaswi Satpute Ashok Kharat Social Media Links Inquiry- भोंदू कॅप्टन अशोक खरात तपास प्रकरणातील माहिती देताना अनेक मुद्दे एसआयटी कडून उपेक्षित?

Sampat Devgire

SIT Tejaswi Satpute News: भोंदू तांत्रिक कॅप्टन अशोक खरात प्रकरणाचा तपास अतिशय गांभिर्याने सुरू आहे. या संदर्भात पहिला गुन्हा दाखल होऊन एक महिन्याचा कालावधी झाला आहे. ११ गुन्हे दाखल असून २४ जणांचे पथक या गुन्ह्याचा तपास करीत असल्याची माहिती एसआयटी तपास प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी सांगितले. 

या प्रकरणातील पीडित महिलांनी लोक काय म्हणतील या भीतीने अन्याय सहन केला. पोलिसात नाशिकला गुन्हा दाखल झाल्यावर काही महिलांनी कुटुंबीयांच्या मदतीने धाडस केले. त्यांनी पुढे येऊन पोलिसात तक्रार केली आहे. या महिलांची ओळख गोपनीय ठेवण्यासाठी तपास पथकाने पूर्ण खबरदारी घेतली आहे. 

भोंदू तांत्रिक कॅप्टन खरात यांनी या महिलांचे व अन्य लोकांचे अतिशय नियोजनपूर्वक शोषण केले. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे उकडण्यात आले. धमक्या देऊन महिलांचे शोषण झाल्याचे, तपासात निष्पन्न झाले, असे पोलीस तपास प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी सांगितले. 

कॅप्टन खरात यांनी आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचे भासविले. या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धा पसरविली. त्याचा आणि तंत्र मंत्राचा वापर करून तो गेली अनेक वर्ष महिला तसेच त्याच्याकडे येणाऱ्यांची लुबाडणूक करीत होता, असेही पोलिसांनी सांगितले.

कॅप्टन अशोक खरात यांनी महिलांचे लैंगिक शोषण केले. तंत्र मंत्र आणि अन्य गैरप्रकार या माध्यमातून अनेक दिवस हे प्रकार सुरू होते. त्याचे चित्रीकरण त्याच्याच कार्यालयात झाले होते. एसआयटी पथकाने त्याचा सखोल तपास केला.  

प्रकरणाच्या अनेक लिंक्स समाज माध्यमांवर व्हायरल झाल्या होत्या. महाराष्ट्र सायबर पथकाने त्यावर सातत्याने मॉनिटरिंग केले. या माध्यमातून ४,६५० लिंक्स व्हायरल झाल्याचे उघड झाले. सर्व लिंक्स काढून टाकण्यात आलेल्या आहेत.

या संदर्भात महिलांच्या हिताचे आणि त्यांच्या अधिकारांचा विचार करून एसआयटीने याबाबत गंभीर कारवाई केली आहे. आता पर्यंत माध्यमांवरील ४५१ खाते बंद करण्यात आली आहेत. यासंदर्भात सातपूर आणि नगर येथे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

यासंदर्भात आज झालेल्या पत्रकार परिषदेबाबत माध्यमांना आणि नागरिकांना मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र अपेक्षाभंग झाला. माध्यमांनी यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या माहिती व्यतिरिक्त अन्य माहिती मिळाली नाही. यामध्ये माध्यमांना न्यायालयांचे निकाल आणि अन्य कलमांची माहिती देऊन बातम्या प्रसिद्ध करण्याबाबत सल्ला देण्याचे काम या पत्रकार परिषदेत केल्याची चर्चा प्रतिनिधींत होती. 

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT