Ashok Kharat case full story : दैवी शक्तीचा दावा करणाऱ्या भोंदू खरातचा 'काळा अध्याय' अखेर संपला! 10 दिवसांत नेमकं काय काय घडलं?

Ashok kharat fraud allegations details : दैवी शक्तीचा दावा करणाऱ्या भोंदू खरातचा काळा अध्याय अखेर संपला. त्या 10 दिवसांत घडलेल्या सर्व घटना आणि तपासाची संपूर्ण माहिती वाचा.
Ashok Kharat case full story
Ashok Kharat case full storySarkarnama
Published on
Updated on

दैवी शक्तीचा दावा करून महिलांना फसवणाऱ्या भोंदू अशोक खरातचा अखेर पर्दाफाश झाला असून, खळबळ माजवून दिलेल्या या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. 17 मार्चपासून सुरू झालेल्या या हायव्होल्टेज घडामोडींमध्ये दररोज धक्कादायक माहिती समोर येत गेली आणि प्रकरण अधिक गंभीर होत गेले.

अशोक खरात हा स्वतःला आध्यात्मिक गुरू असल्याचे भासवत होता. देवाचा कोप होईल अशी भीती दाखवून तो महिलांना आपल्या जाळ्यात ओढत असे. या भीतीचा गैरफायदा घेत त्याने अनेक महिलांचे शारीरिक व मानसिक शोषण केल्याचे तपासात उघड झाले आहे. काही प्रकरणांमध्ये सक्तीने गर्भपात घडवून आणल्याचाही आरोप आहे.

Ashok Kharat case full story
Ashok Kharat Case: खरातमुळे आता पोलिस, तहसीलदार, प्रांत अडचणीच्या फेऱ्यात; एका पिस्तुलमुळे SIT च्या निशाण्यावर

17 मार्च रोजी रात्री उशिरा खरातविरुद्ध पहिला गुन्हा दाखल झाला. त्यानंतर 18 मार्च रोजी पहाटे 3:00 वाजता पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्याला अटक केली. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता 19 मार्च रोजी विशेष तपास पथका म्हणजे SITची स्थापना करण्यात आली.

तपास जसजसा पुढे गेला, तसतसे नवे गुन्हे समोर येऊ लागले. 21 मार्च रोजी अत्याचार आणि सक्तीच्या गर्भपाताचे स्वतंत्र गुन्हे नोंदवण्यात आले. 23 मार्च रोजी आणखी तीन महिलांनी पुढे येत तक्रारी दिल्या. 24 मार्च रोजी एका युवतीने धाडस दाखवत तक्रार नोंदवली, ज्यामुळे प्रकरण अधिकच बळकट झाले.

25 मार्च रोजी तपासात एक नवीन धक्कादायक बाब समोर आली. खरात महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे उकळत असल्याचे उघड झाले आणि त्याच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल झाला. 27 मार्च रोजी अत्याचार आणि खंडणीचे आणखी दोन गुन्हे दाखल करण्यात आले.

दरम्यान, तपासादरम्यान काही पीडितांचे व्हिडिओ वापरून त्यांना धमकावले जात असल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांनी खरातच्या आश्रम आणि घरातून महत्त्वाचे पुरावे जप्त केले असून त्याच्या संपत्तीचीही चौकशी सुरू आहे.

Ashok Kharat case full story
Ashok Kharat SIT Investigation : अशोक खरातकडील 'त्या' गुंगी आणणाऱ्या पेढ्यात नेमकं काय? SIT लावणार छडा, कोर्टात काय दिली माहिती?

18 ते 24 मार्च या काळात पहिल्या टप्प्यात चौकशी झाली, तर 25 ते 29 मार्च दरम्यान आर्थिक व्यवहार आणि खंडणीच्या प्रकरणांची सखोल तपासणी करण्यात आली. सध्या खरात कडक पोलीस बंदोबस्तात असून तपास सुरू आहे.

या प्रकरणामुळे समाजात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी इतर पीडित महिलांनाही पुढे येण्याचे आवाहन केले आहे. त्यांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com