Ganesh Gite BJP Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik NMC Election : गिरीश महाजनांच्या कृपेने भाजपात कमबॅक, त्याच गणेश गितेंचा डावही यशस्वी : आरक्षणानंतर पत्नीच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा

Ganesh Gite BJP : गणेश गिते यांनी पूर्व मतदारसंघातून विधानसभेला बंडखोरी केली होती. पराभवानंतर त्यांनी पुन्हा भाजपत प्रवेश केला. आता मनपा निवडणुकीत त्यांच्या सोयीचे आरक्षण पडले आहे.

Ganesh Sonawane

Nashik NMC Election : नाशिक महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी मंगळवारी (दि. ११) ३१ प्रभागांची आरक्षण सोडत काढण्यात आली. नव्या आरक्षण सोडतीने बहुंताश दिग्गज हे सुरक्षित राहिले आहेत. परंतु काहींना आरक्षण बदलाचा फटका बसल्याने त्यांचा हिरमोड झाला आहे. तर काहींनी ठरवल्याप्रमाणे त्यांच्या सोयीचे आरक्षण निघाले आहे.

प्रभाग क्रमांक १ क मध्ये भाजपचे स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गिते यांच्या सोयीचे आरक्षण निघाले आहे. या प्रभागात ओबीसी महिला आरक्षण जाहीर झाले असून गिते यांच्या पत्नी सौ. दिपाली गिते या दोन महिन्यांपासून त्या प्रभागात प्रचार करत आहेत. त्यामुळे त्यांच्या पत्नी दीपाली गिते नागरिकांचा मागासप्रवर्ग महिला राखीव या जागेवर लढण्याची शक्यता आहे.

गणेश गिते यांनी विधानसभेला भाजपमधून बंडखोरी करत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून भाजपच्या राहुल ढिकले यांच्या विरोधात निवडणून लढवली होती. मात्र गितेंचा पराभव झाला. त्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांचे ते निकटवर्तीय असल्याने महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने पुन्हा ढिकलेंची समजूत घालत महाजन यांनी गितेंना भाजपत प्रवेश दिला. आता त्यांच्या पत्नी भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

पंचवटीतील प्रभाग क्रमांक दोन व सहा मधील अनुसूचित जमातीची जागा महिला राखीव झाल्याने दोनमधून सुरेश खेताडे व सहा मधून पुंडलिक खोडे यांचा पत्ता कट झाला आहे. प्रभाग एकमधील अनुसूचित जमातीची जागा जी महिला राखीव होती ती आता महिला राखीव नाही. तरीही या जागेवरून रंजना भानसी यांना निवडणूक लढविणे शक्य आहे. पुनम धनगर यांना पुन्हा संधी आहे.

माजी नगरसेवक अरुण पवार हे सर्वसाधारण गटातून उमेदवारी करू शकतील. प्रभाग २ मध्ये अनुसूचित जाती महिला राखीव असल्याने पूनम सोनवणे यांना पुन्हा संधी आहे. या प्रभागात अनुसूचित जमाती महिला राखीव झाल्याने खेताडे अडचणीत आले आहेत. सर्वसाधारण महिला राखीव नसल्याने शितल माळोदे लढू शकणार नसल्या तरी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना नागरिकांचा इतर मागासप्रवर्ग व सर्वसाधारण असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. (Nashik News)

प्रभाग ३ मध्ये चारही माजी नगरसेवकांना पुन्हा संधी आहे. प्रभाग ५ मध्ये (कै.) विमल पाटील यांचे निधन झाले आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातून त्यांच्या स्नुषा निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. अनुसूचित जमाती महिला राखीव झाल्याने पुंडलिक खोडे यांचा पत्ता कट झाला आहे. त्यांना महिला उमेदवार तयार करावी लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT