Chhagan Bhujbal : येवल्यात भुजबळांच्या विरोधात दराडे बंधूंना शरद पवारांच्या नेत्याची साथ मिळणार? नव्या प्रयोगाची चर्चा रंगात

Darade brothers Vs Chhagan Bhujbal : मंत्री छगन भुजबळ यांना टक्कर देण्यासाठी नरेंद्र दराडे व किशोर दराडे यांना शरद पवार यांच्या पक्षाचा मोठा नेता मदत करणार का? यावरुन येवल्याच्या राजकारणात सध्या खलबते सुरु आहे.
Darade brothers Vs Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal, Kishore Darade, Narendra DaradeSarkarnama
Published on
Updated on

Yeola Politics : राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते व राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा मतदारसंघ असलेल्या येवला नगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. येवला नगरपालिकेत छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांची भाजपसोबत युतीची चर्चा सुरु आहे.

येवल्यात भुजबळांचा गट आणि शिवसेना (शिंदे) गट एकमेकांच्या विरोधातील आहे. त्यामुळे भाजपसोबत युती करुन शिवसेनाला (शिंदे गट) शह देण्याचा समीर भुजबळ यांचा प्रयत्न आहे. परंतु भाजपने नगराध्यक्षपदावर दावा केल्याने काहीसे घोडे आडले आहे.

2016 ची निवडणूक ही मंत्री छगन भुजबळ यांच्या अनुपस्थितीत झाली होती. त्यावेळी भाजप-शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत झाली होती. त्यावेळी किशोर दराडे व नरेंद्र दराडे या दोघा बंधूंच्या पुढाकाराने भाजपचे बंडू क्षीरसागर यांच्या गळ्यात नगराध्यक्ष पदाची माळ पडली होती. परंतु आता येवल्यात सर्व पक्षांची समीकरणे पूर्णंत: बदलली आहे.

Darade brothers Vs Chhagan Bhujbal
Girish Mahajan : इकडे कांदे तिकडे भुजबळ, संकटमोचक म्हणतात मधला मार्ग काढू, पण कोणता?

महायुती म्हणून राज्यात शिवसेना व राष्ट्रवादी दोन्ही पक्ष भाजपसोबत सत्तेत आहे. पण स्थानिक पातळीवर ही समीकरणे बदलताना दिसतात. एकेकाळी जवळचे सहकारी असलेल्या शिवसेनेचे नरेंद्र दराडे व राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांच्यात आता मोठी दरी आहे. त्यामुळे नगरपालिकेत दराडे बंधू व भुजबळांमध्ये सामना रंगणार आहे.

भुजबळांना टक्कर देण्यासाठी येवल्यात आता सध्या नव्या समीकरणाची चर्चा रंगात आहे. विधानसभेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माणिकराव शिंदे यांनी छगन भुजबळ यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळी दराडे बंधू हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात असल्याने माणिकराव यांच्या सोबत होते.

मात्र त्यानंतर आमदार दराडे बंधू शिवसेना शिंदे गटात गेल्याने आता दराडे बंधू व शिंदे एकत्र येतील का मोठा प्रश्नच आहे. मात्र नगरपालिका निवडणुकीत स्थानिक समीकरणे पाहाता भुजबळांना शह देण्यासाठी दोघे दराडे बंधू व शिंदे हे एकत्र येऊन शहर विकास आघाडीच्या नव्या प्रयोगाची चर्चा आहे.

Darade brothers Vs Chhagan Bhujbal
Sameer Bhujbal : समीर भुजबळांची खेळी, भाजपला सोबत घेऊन सुहास कांदेंना एकटं पाडणार

दरम्यान आता समीर भुजबळ यांची भाजप सोबत बोलणी सुरु असल्याने भाजपची भूमिका ही राष्ट्रवादी, शिवसेनेसाठी निर्णायक ठरणार आहे. माजी खासदार समीर भुजबळ व आमदार पंकज भुजबळांकडून राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी सुरु आहे. शिवसेनेकडून आमदार किशोर दराडे, माजी आमदार नरेंद्र दराडे यांच्याकडून फिल्डिंग लावली जात आहे. राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाकडून माणिकराव शिंदे यांनीही उमेदवार शोधले आहेत. दरम्यान शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संभाजी पवार यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com