Nashik Uddhav Sena controversy On swikrut nagarsevak Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Politics : ठाकरेसेनेत स्वीकृतवरून अंतर्गत धुसफूस ; नाशिकमध्ये पक्ष कार्यालयाबाहेर लागलेल्या ‘त्या’ होर्डिंगची चर्चा...

Nashik Uddhav Sena controversy On swikrut nagarsevak : नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकपदाच्या निवडीवरून शिवसेना ठाकरे गटातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. पक्षकार्यालयाबाहेरच बॅनर लागल्याने चर्चा रंगली आहे.

Ganesh Sonawane

Nashik Politics : नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकपदाच्या निवडीवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील अंतर्गत अस्वस्थता आता उघडपणे समोर येऊ लागली आहे.

पक्षाच्या शालिमार येथील कार्यालयाबाहेरच अज्ञात शिवसैनिकांनी लावलेल्या बॅनरवरुन ही धूसफूस चव्हाट्यावर आली आहे. 'साहेब, यावेळेस ज्यांनी निवडणूक लढवली त्यांना स्वीकृत न देता स्वीकृत नगरसेवकपदासाठी कडवट निष्ठावंत शिवसैनिकांना न्याय द्याः असा मजकूर या होर्डिंगवर आहे. हे होर्डिंग पाहाता स्वीकृत नगरसेवकपदाच्या संधीवरून पक्षांतर्गत नाराजी समोर आली आहे.

न्यायालयाच्या आदेशानंतर स्वीकृत नगरसेवकपदासाठी हालचाली गतिमान झाल्या असून, त्यासाठी इच्छुकांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. मात्र, स्वीकृतवरून निष्ठावंत विरुद्ध निवडणूक लढविलेले इच्छुक असा संघर्ष असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सर्वच पक्षांमध्ये ही स्पर्धा आहे.

दरम्यान, उद्धवसेनेतील काही शिवसैनिकांनी थेट शालीमार येथील पक्षकार्यालयाबाहेरच होर्डिंग लावलं आहे. स्वीकृत नगरसेवक पद मिळावे यासाठी होर्डिंगद्वारे थेट उद्धव ठाकरेंना साद घातली आहे. यापूर्वी निवडणूक लढविलेल्यांना पुन्हा स्वीकृत नगरसेवकपदाची संधी देण्याऐवजी पक्षासाठी दीर्घकाळ काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्राधान्य द्यावे, अशी या होर्डिंगमधून मागणी केली आहे.

नाशिक महापालिकेत एकुण दहा स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती केली जाणार आहे. भाजपचे सर्वाधिक ७२ नगरसेवक असल्याने गुणांकानुसार सहा स्वीकृत सदस्य निवडून दिले जाणार आहे. त्याखालोखाल शिंदेच्या शिवसेनेचे दोन व ठाकरे सेनेचे दोन असे वाटप होणार आहे.

कॉंग्रेसची वरिष्ठाकडे तक्रार

काँग्रेसने ठाकरे सेनेसह गटनोंदणी केली आहे. त्यामुळे दोन्ही जागांवर ठाकरे सेनेने दावा केला आहे. त्यात दोन नावे निश्‍चित करण्यात आली आहे. यातील एक नाव वरिष्ठ नेत्याच्या मुलाचे आहे. दुसरे नाव पक्षाच्या वरिष्ठांकडून आल्यानंतर अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे, तर काँग्रेसनेदेखील गटनोंदणी एकत्र केल्याने एका जागेवर दावा केल्याने दोन्ही पक्षात नाराजीनाट्य रंगले आहे. ठाकरे सेनेने दोन्ही जागांवर दावा केल्याने यासंदर्भात काँग्रेसने वरिष्ठांकडे तक्रार केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT