Nashik Pothole Crisis | MGNL | Municipal Corporation sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Pothole : गिरीश महाजनांनी MGNL कंपनीला खडसावलं अन् महापालिकेवरच गेम उलटला; खड्ड्यांसाठी दिलेले 290 कोटी लाडक्या नगरसेवकांकडे...

MGNL on Nashik Municipal Corporation : शहरातील रस्त्यांवर खड्डे पडल्याने सहा नागरिकांचा मृत्यू झाला. शंभराहून अधिक नागरीक जखमी झाले. रोज नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे यावरून राजकारण तापले आहे. या प्रश्नावर नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या.

Sampat Devgire

Nashik MGNL News, 12 Aug : शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नांवर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी बैठक घेतली. या बैठकीत महानगर गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन करून खडसावले होते. मात्र आता हा डाव महापालिकेवरच उलटल्याचे चित्र आहे.

शहरातील रस्त्यांवर खड्डे पडल्याने सहा नागरिकांचा मृत्यू झाला. शंभराहून अधिक नागरीक जखमी झाले. रोज नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे यावरून राजकारण तापले आहे. या प्रश्नावर नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या.

महासभेत विरोधकांनी आंदोलन केल्याने थेट महापालिकेला इशारा देण्यात आला. त्यामुळे अलर्ट झालेले कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन तातडीने नाशिक शहरात दाखल झाले होते. पालिका अधिकाऱ्यांच्या बैठकीत मंत्री महाजन यांनी MGNL कंपनीला जबाबदार धरले होते.

कंपनीच्या अधिकाऱ्यांना बैठकीतूनच फोन लावत खडसावले होते. दुसऱ्या दिवशी महापालिका आयुक्तांनी बैठक घेऊन एमजीएनएल कंपनीच्या अधिकाऱ्यांवर खापर फोडले होते. मात्र आता हा डाव महापालिकेच्या प्रशासनावरच उलटला आहे. खड्डे काढण्यासाठी एमजीएनएल कंपनीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. त्यामुळे वारंवार खड्डे बुजवावे लागत नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे.

विशेष म्हणजे कंपनीने खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेला 302 कोटी रुपये अदा केले. यातील केवळ 102 कोटी रुपये खड्डे बुजविण्यासाठी उपलब्ध झाल्याचा दावा संबंधित अधिकाऱ्यांनी केला. 290 कोटींचा हिशेब मिळत नसल्याने अधिकाऱ्यांची धावाधाव सुरू झाली आहे.

यासंदर्भात एमजीएनएल अर्थात महानगर गॅस कंपनीला दोषी धरणाऱ्या महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनाही विचारणा होत आहे. सहा नागरिकांचा बळी गेला असताना खड्डे बुजविण्याचे 290 कोटी रुपये परस्पर काही लाडक्या व सत्ताधारी नगरसेवकांच्या प्रभागात वळविण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे एमजीएनएल कंपनीने महापालिकेवरच डाव उलटवला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT