Nashik Kumbh Mela: कुंभमेळ्याआधी नाशिकमध्ये खड्ड्यांचं राजकारण तापलं; उद्धव ठाकरेंच्या आंदोलनानंतर फडणवीसांचा दौरा

Nashik Kumbh Mela 2027 preparations: देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात शहरातील खड्ड्यांवर महापालिकेला तंबी दिली होती. त्यानंतर प्रशासन सक्रिय झाल्याचे चित्र आहे. खड्डे बुजविण्याची कार्यवाही सुरू आहे.
Devendra Fadnavis Nashik visit
Devendra Fadnavis Nashik visitSarkarnama
Published on
Updated on
  • नाशिकच्या खड्ड्यांवरून राजकारण तापलं; ठाकरे गटाकडून 17 ऑगस्टला आंदोलनाची घोषणा

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढील आठवड्यात नाशिक दौऱ्यावर; कुंभमेळ्याच्या कामांचा घेणार आढावा

  • कुंभमेळ्याच्या तयारीसोबत शहरातील खड्डेही रडारवर; महापालिका प्रशासन अलर्ट

Nashik Kumbh Mela Latest Update: सिंहस्थ कुंभमेळा जवळ आला असताना आता साधू महंतही त्यावर नाराज आहेत. मंत्री गिरीश महाजन याबाबत सतत दौरे करीत आहेत. मात्र वाद आणि आरोप प्रत्यारोप थांबण्याची चिन्हे नाहीत.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षसह भाजपचे सत्तेत असलेले सहकारी पक्षही शहरातील कामकाजाबाबत अस्वस्थ आहेत. नागरिकांमधील नाराजी आणि शहरातील खड्डे हे त्याचे कारण आहे. त्यामुळे नाशिकची आता रोजच चर्चा होत आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. त्याला गिरीश महाजन यांनी आव्हान दिले होते. या आरोप प्रत्यारोपांच्या राजकारणात आता थेट आंदोलनाची घोषणा झाली आहे.

विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात शहरातील खड्ड्यांवर महापालिकेला तंबी दिली होती. त्यानंतर प्रशासन सक्रिय झाल्याचे चित्र आहे. खड्डे बुजविण्याची कार्यवाही सुरू आहे.

पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढच्या आठवड्यात नाशिकला येत आहे. कुंभमेळ्याच्या विकास कामांचा आढावा आणि शहरातील खड्डे हा दौऱ्याचा मुख्य विषय आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नाशिकला आढावा बैठक होईल.

Devendra Fadnavis Nashik visit
Gadchiroli News: तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूनंतर मुख्याध्यापकांसह तिघांवर गुन्हा; आश्रमशाळा कायमस्वरूपी बंद, फडणवीसांचा आदेश

त्यामुळे भाजपच्या पदाधिकारी आणि नागरिकांसह अधिकाऱ्यांमध्येही अलर्ट झाले आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे यांचा मेळावा 17 ऑगस्टला होत आहे. त्यानंतर लगेचच मुख्यमंत्री फडणवीस नाशिकचा दौरा करीत आहेत. त्यामुळे कुंभमेळ्याची कामे आणि त्यावरील राजकारण पुन्हा तापण्याची चिन्हे आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com