BJP Corporators : CM फडणवीसांच्या कार्यक्रमाला दांडी मारणं नगरसेवकांच्या अंगलट येणार; भाजप 'त्या' 40 जणांना नोटीस पाठवणार

BJP Nagpur Politics : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यक्रमाला भाजपच्या 110 नगरसेवकांनी उपस्थित राहणे अपेक्षित होते. मात्र, त्यापैकी 40 नगरसेवकांनी कार्यक्रमाला दांडी मारल्याने पक्षात चर्चा सुरू झाली आहे. पूर्वसूचना देऊनही तसेच कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करूनही 40 नगरसेवक गैरहजर राहिल्याचे समोर आले आहे.
Devendra Fadnavis | BJP Corporators | Nagpur Politics
Devendra Fadnavis | BJP Corporators | Nagpur PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News, 12 Aug : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिलेल्या नागपुरमधील भाजपच्या तब्बल 40 नगरसेवकांना नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी नागपूरमधील सुरेश भट सभागृहात दिव्यांगांसाठी साहित्य वाटप शिबिराच्या समारोपाचा कार्यक्रम मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पार पडला.

या कार्यक्रमाला भाजपच्या 110 नगरसेवकांनी उपस्थित राहणे अपेक्षित होते. मात्र, त्यापैकी 40 नगरसेवकांनी कार्यक्रमाला दांडी मारल्याने पक्षात चर्चा सुरू झाली आहे. पूर्वसूचना देऊनही तसेच कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करूनही 40 नगरसेवक गैरहजर राहिल्याचे समोर आले आहे.

त्यामुळे अनुपस्थित नगरसेवकांची यादी तयार करण्यात आली असून, त्यांना नोटीस बजावण्याचा निर्णय महापालिकेतील सत्तापक्ष नेते बाल्या बोरकर यांनी घेतल्याची माहिती आहे. या नोटिशीद्वारे संबंधित नगरसेवकांना कार्यक्रमाला अनुपस्थित राहण्याचे कारण स्पष्ट करण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नगरसेवक गैरहजर राहिल्याने आता या प्रकरणात भाजपकडून पुढे नेमकी काय कारवाई केली जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर जिल्ह्यातील अस्थिव्यंग आणि कर्णबधिर दिव्यांग व्यक्तींना मोफत जयपूर फूट साहित्य तसेच विविध सहाय्यक साधनांचे वाटप करण्यात आले.

Devendra Fadnavis | BJP Corporators | Nagpur Politics
Raj Thackeray Meets Fadnavis : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड! ठाकरे थेट CM फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल

यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, देशभरात प्रसिद्ध असलेल्या जयपूर फूट आणि इतर दिव्यांग सहाय्यता साहित्यामुळे अनेक दिव्यांगांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणे शक्य झाले आहे. कृत्रिम पाय, हात आणि अन्य कृत्रिम अवयवांच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना दैनंदिन जीवनातील विविध कामे अधिक सुलभपणे करता येतात.

Devendra Fadnavis | BJP Corporators | Nagpur Politics
Nashik Potholes : ठाकरेंनी मोर्चाची घोषणा करताच भाजपसह महापालिका लागली कामाला; CM फडणवीसांची बैठक, तर आयुक्तांनी 36 अधिकाऱ्यांना धाडल्या नोटीस!

भगवान महावीर विकलांग सहाय्यता समिती ही 1975 पासून देशात आणि देशाबाहेर दिव्यांग व्यक्तींना मदत करण्याचे उल्लेखनीय कार्य करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तींसाठी अधिक सन्मानजनक म्हणून 'दिव्यांग' हा शब्द प्रचलित केला असून, दिव्यांगांच्या अडचणी कमी करण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील असल्याचंही फडणवीस यावेळी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com