Prakash Londhe Case sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Crime : गोळीबार प्रकरणात तिकडे आरपीआय नेते लोंढे टोळीसह जेलमध्ये, मग पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न कुणी केला?

Prakash Londhe gang Nashik firing Case : लोंढे गोळीबार प्रकरणात आरपीआय नेते प्रकाश लोंढे यांच्यासह संपूर्ण टोळी कारागृहात असताना नवा ट्विस्ट समोर आला आहे.

Ganesh Sonawane

Nashik Crime : गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये नाशिकमधील सातपूरच्या आयटीआय सिग्नलजवळील एका बारमध्ये झालेल्या 'प्रोटेक्शन मनी'साठीच्या गोळीबार, खंडणी व दहशत निर्माण प्रकरणात माजी नगरसेवक व आरपीआयचा जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्यासह त्यांच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. लोंढेसह त्याची संपूर्ण टोळी सध्या नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात आहे.

या गुन्ह्यात पोलिसांनी ज्या धडाडीने कारवाई केली होती ती राज्यभर चर्चेत आली होती. नाशिक पोलिसांची कायद्याचा बालेकिल्ला मोहीम राज्यभर गाजली. याशिवाय प्रकाश लोंढे यांच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोजर चालवण्यात आला होता. लोंढे यांच्या कार्यालयात भुयार आढळलं होतं, त्याचा वापर गुन्हेगारी कारवायांसाठी केल्या जात असल्याचं समोर आलं होतं.

दरम्यान आता लोंढे टोळीने केलेल्या गोळीबार प्रकरणात आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बारचालकासह एकाने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती आहे. पोलिसांनी दोन्ही संशयितांना अटक केली आहे. हा प्रकार पाहाता लोंढे गोळीबार प्रकरणात नवा ट्टविस्ट समोर आला आहे.

या प्रकरणाचा तपास अंबड विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सचिन बारी हे करत आहे. बार चालक संशयित बिपिन पुरुषोत्तम पटेल व साथीदाराने रक्ताचे डाग व इतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला असल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यानुसार दोघांनाही अटक करून नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते.

दरम्यान, ५ ऑक्टोबरच्या मध्यरात्री सातपूरच्या आयटीआय सिग्नलजवळील बारमध्ये काही तरुणांमध्ये वाद झाला होता. बिअरबारमध्ये झालेल्या वादातून एकावर थेट गोळी झाडण्यात आली होती. या राड्यानंतर संशयित भूषण प्रकाश लोंढे हा फरार झाला होता. पोलिसांने त्याचे वडील प्रकाश लोंढे व भाऊ दीपक लोंढे यांना अटक केली होती. त्यानंतर नाशिक पोलिस आयुक्तांकडून गुन्हेगारी नियंत्रणासाठी 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' ही मोहीम राबविण्यात आली होती.

दरम्यान, पोलिसांनी एक -एक करत या संपूर्ण लोंढे टोळीच्या मुसक्या आवळल्या होत्या. फरार भूषण लोढे व त्याचा साथीदार प्रिन्स सिंग यालाही पोलिसांनी नेपाळ सीमेवर बेड्या ठोकल्या होत्या. त्यानंतर 'पीएल टोळी'चा मुख्य सूत्रधार व म्होरक्या 'रिपाइं'चा जिल्हाध्यक्ष व माजी नगरसेवक प्रकाशलोंढे उर्फ बॉस यांच्यासह संपूर्ण टोळीवर पोलिस आयुक्तालयाने 'मोक्का' लावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT