Nashik Rain Alert : भारतीय हवामान विभागाने मंगळवार दि. 7 जुलै रोजी नाशिक जिल्ह्याला हाय अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यातील काही भागात ढगफुटी संभावित असल्याने नागरिकांनी सतर्क राहून जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
राज्यभरात पावसाने हाहाकार माजवला आहे. अनेक भागांमध्ये पूरस्थिती असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यादृष्टीने राज्यातील सरकारी यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. अनेक ठिकाणी शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून खासगी कार्यालयांना वर्कफ्रॉम होमचे आदेश देण्यात आले. कुठे झाडं कोसळत आहे, कुठे घर कोसळत आहेत तर कुठे दरड कोसळत आहेत. स्थिती गंभीर होताना दिसत आहे. राज्यात 8 तारखेपर्यंत अलर्ट आहे.
या दरम्यान स्वत : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि सगळ्या जिल्ह्यातले जिल्हाधिकारी, विभाग प्रशासन यांच्याशी आम्ही चर्चा केली असून त्यांनी काय नियोजन केलं आहे याचा आढावा मी घेतला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
फडणवीस म्हणाले, उद्या महत्वाचा अलर्ट आहे तो नाशिकला आहे. नाशिकमध्ये ढगफुटीची शक्यता आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. एक अतिशय मोठा लो प्रेशर बेल्ट नाशिकमध्ये तयार होतो आहे. त्यामुळे जो काही नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा मधला भाग आहे. या भागात उद्या ढगफुटी होऊ शकते, तसे निर्देश मिळाले आहेत. ही ढगफुटी मेजर असू शकते. त्यातून जवळपास ३०० एमएम पाऊस नाशिकमध्ये पडू शकतो असं फडणवीसांनी सांगितलं.
त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात तयारी केली आहे. नाशिक शहर, जिल्हा आणि ग्रामीण भाग या ठिकाणी ढगफुटीमुळे जी परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यासाठीच्या उपाय योजना करण्यात आल्या आहेत. कारण ही एक मोठी घटना घडू शकते असं फडणवीसांनी म्हटलं आहे. नाशिककरांना सतर्क राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने पत्रकापरिषद बोलावली आहे. उद्या जिल्ह्यातील शाळांना सुट्टी दिली जाऊ शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.