Girish Mahajan : दोन महिन्यांत दोनदा नाशिककरांची माफी मागणारे गिरीश महाजन; नेमकं काय घडलं?

Girish Mahajan apology Nashik citizens,, मंत्री गिरीश महाजन यांनी जून महिन्यात झालेल्या पहिल्या पावसातच नाशिककरांची माफी मागितली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी नाशिककरांची माफी मागितली आहे.
Girish-Mahajan
Girish-MahajanSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : नाशिककरांची कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी सलग दुसऱ्यांदा माफी मागितली आहे. त्याचे कारणही तसेच आहे. शहरात कुंभमेळ्याची कामे सुरु असून सगळी कामे अर्धवट आहे. अशात गेल्या चार पाच दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने रस्त्यांची ऐशीतैशी झाली असून शहराची वाट लागली आहे. त्यामुळे नाशिककरांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून मोठे हाल होत आहेत.

शहरभर रस्ते खोदलेले आहेत, त्यामुळे नाशिककरांना त्रास सोसावा लागत आहे. खरेतर जूनमध्ये झालेल्या पहिल्याच पावसात नाशिककरांचे मोठे हाल झाले. त्यामुळे तेव्हाच गिरीश महाजन यांनी नाशिककरांची माफी मागितली होती. आता जुलै मध्ये पावसाचा जोर वाढला असून नाशिककरांना होणारा त्रासही वाढला आहे. त्यामुळे गिरीश महाजन यांनी पुन्हा एकदा नाशिककरांची माफी मागितली आहे.

गिरीश महाजन यांनी रविवारी माध्यमांशी येथे संवाद साधला. ते म्हणाले, नाशिककरांना जो त्रास सोसावा लागात आहे, त्याबद्दल मी नाशिककरांची माफी मागतो, मात्र आज त्रास होत असला तरी नाशिककरांचे भविष्य मात्र निश्चित चांगले असेल. मिशन ग्रीन मॉन्सून उपक्रमांतर्गत नाशिकमध्ये एक लाख झाडे लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Girish-Mahajan
Girish Mahajan : मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः हातात घेतलं फावडं; नाशिककरांनाही घातली साद, एक लाख वृक्ष लागवडीचं टार्गेट

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात रस्त्यांची विविध कामे गतीने सुरू आहेत. या कामांच्या दर्जा व गुणवत्तेशी कोठेही तडजोड केली जाणार नाही. सर्व रस्ते नव्याने केले जात असून, कॅनॉल रोडचेही काम करण्यात येईल. या कामांसाठी केलेल्या खोदकामामुळे सध्या नाशिककरांना त्रास होत असला, तरी नाशिककरांचे भविष्य चांगले असेल, असा विश्‍वास त्यांनी नाशिककरांना दिला.

सर्व अधिकारी आणि लोकप्रतिनिधी स्वतः फिल्डवर उतरून लक्ष ठेवून आहेत, दर्जेदार काम होण्यासाठी सर्वांचेच प्रयत्न सुरू आहेत असं महाजन म्हणाले.

Girish-Mahajan
Girish Mahajan Viral Photos : 'तिला वडील नाहीत, तिच्या लग्नाची जबाबदारी माझ्यावर'; तरुणीसोबतच्या व्हायरल फोटोंवर गिरीश महाजनांचा खुलासा

ठाकरेंवर टीकास्र

अयोध्येतील राममंदिरात झालेल्या कथित दानचोरी विरोधात ठाकरेंनी पुकारलेल्या रामरक्षा आंदोलनाकडे महाजनांचे लक्ष वेधण्यात आले. महाजन म्हणाले, त्यांच्या पक्षात कोणीही थांबायला तयार नाहीत. त्यामुळे ठाकरेंनी पक्ष आणि अस्तित्व टिकविण्यासाठी रामरक्षा आंदोलन पुकारले आहे. रामरक्षा आंदोलनातून अस्तित्व टिकविण्यासाठी केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. अयोध्येतील कथित घोटाळ्याच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली. जे समोर येतील ते सगळे जेलमध्ये जातील, असे महाजन यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com