Nashik Ring Road Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Ring Road : कुंभमेळ्याचा महत्त्वाकांक्षी रिंगरोड प्रकल्प अडचणीत, ४० हून अधिक शेतकऱ्यांची हायकोर्टात धाव..

Nashik Ring Road Project : बाह्य रिंगरोड भूसंपादनाविरोध शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतल्याने प्रशानाची धावपळ उडाली आहे. कुंभमेळ्यापूर्वीच मोठा कायदेशीर पेच निर्माण झाला आहे.

Ganesh Sonawane

Nashik Kumbmela : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी अतिशय महत्वपूर्ण ठरणारा ६६.६५ किलोमीटरचा बाह्य रिंगरोड उभारण्यात येत आहे. मात्र हा महत्वाकांक्षी प्रकल्प मोठ्या अडचणीत सापडला आहे.

बाह्य रिंगरोड भूसंपादनात कायद्याचे उल्लंघन झाल्याचा मुद्दा उपस्थित करीत ४० हून अधिक बाधित शेतकऱ्यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. त्यामुळे आता वादाच्या शक्यतेने प्रशासनाची धावपळ उडाली आहे.

पुढील वर्षी नाशिकमध्ये कुंभमेळा आहे. मंत्री गिरीश महाजन हे कुंभमेळा मंत्री म्हणून काम बघत आहे. शहरात हजारो कोटींची कामे सुरु आहेत. बाह्य रिंगरोड हा सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. नाशिकसह दिंडोरी तालुक्यातील २५ गावांमधून हा मार्ग जाणार आहे. त्यासाठी ३६७ हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात येत आहे. मात्र, महसूल प्रशासन घाईघाईत संपादनाची प्रक्रिया राबवित असून त्यात कायद्याचे उल्लंघन होत असल्याचा आरोप बाधित शेतकऱ्यांनी केला आहे.

यासंदर्भात संबंधित ४० हुन अधिक बाधित शेतकऱ्यांनी थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने देखील तत्काळ या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत प्रकल्पाशी संबंधित सर्वच विभागांना नोटिसा बजावल्या आहेत. तसेच २८ एप्रिलपर्यंत उत्तर सादर करावे असे आदेश दिले आहेत.

याप्रकरणी न्यायमूर्ती मनीष पितळे आणि श्रीराम शिरसाठ यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. दरम्यान, पुढील सुनावणीप्रसंगी अंतरिम दिलाशाबद्दल निर्णय होणार आहे. त्यामुळे सिंहस्थाच्या अनुषंगाने शासनाचा महत्त्वपूर्ण प्रकल्पाचे भवितव्य काय असणार, हे सुनावणीवर अवलंबून आहे.

रिंगरोडसाठी आदिवासी गावांमध्ये भूसंपादन करताना प्रशासनाने पेसा कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप काही याचिकाकर्त्यांनी केला आहे. तसेच, कायद्यानुसार संरक्षण मिळणे अपेक्षित असताना प्रशासनाने ते धुडकावले, असा दावा करण्यात आला आहे. त्यात पुर्नवसन व पुर्नस्थापनेवर प्रश्‍नचिन्ह असून, आदिवासी बांधवांच्या हक्कांवर गदा आणल्याचा आरोप केला जात आहे. दुसरीकडे प्रशासनाच्या दाव्यानुसार ६० टक्के जागामालकांनी प्रकल्पासाठी जमीन देण्यास संमती दर्शवली. परिणामी, संपूर्ण प्रकल्पासाठी थेट खरेदीची प्रक्रिया राबविली जाऊ शकते, असा दावा प्रशासनाने केला आहे.

रिंगरोडसाठी थेट खरेदीच्या नावाखाली जिल्हा प्रशासनाने २०१३ च्या भूसंपादन कायद्यातील तरतुदींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. तब्बल ७ हजार ८०० कोटींचा हा प्रकल्प आहे. त्यातील तीन हजार १०० कोटींचा खर्च हा महामार्गाच्या उभारणीवर केला जाणार आहे. त्यासाठीच्या निविदा प्रक्रियेला मंजुरी मिळाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT