Sand & Minaral Mafia Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Mineral Mafia: मंत्र्यांच्या मतदारसंघातच खनिज माफिया सुसाट; कारवाईसाठी गेलेल्या नायब तहसीलदारावरच हल्ला!

Nashik Sand & Minral mafia brutally attacks Naib Tehsildar who went to take action- नाशिक जिल्ह्यात वाळू आणि खनिज माफियांची दादागिरी वाढली, राजकारणात सक्रीय माफियांकडून प्रशासनालाही दिले जातेय आव्हान!

Sampat Devgire

Nashik Crime: नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा वाळू आणि खनिज माफीयांनी उचल खाल्ली आहे. यातील अनेक माफिया थेट सत्ताधारी पक्षांच्या राजकारणात सक्रिय आहेत. त्यामुळे कारवाई होऊनही गैरप्रकार थांबण्याची चिन्हे नाहीत. 

नाशिक जिल्ह्यात गोदावरी, गिरणा आणि अन्य नद्यांच्या खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर वाळूचा उपसा केला जातो. कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते. त्यामुळे वाळू आणि खनिज माफिया यांच्याकडे राजकीय पदांबरोबरच साधन संपत्तीही वाढली आहे. त्याच्या जोरावर राजरोस अवैध व्यवसाय केले जातात. 

महसूल आणि पोलीस विभागाकडून कारवाई होऊनही हे माफिया बेछूट काम करीत आहेत. ते कोणत्याही कारवाईला जुमानत नसल्याचे अनेक प्रकार घडले आहे. विशेषता वाळू माफिया थेट सत्ताधारी राजकीय पक्षांची राजकीय सूत्रे हलवीत असल्याचे चित्र आहे. 

जिल्ह्यात तीन मंत्री आहेत. यातील एका मंत्र्याच्या मतदारसंघात खनिज माफीयांनी थेट कारवाई करण्यास केलेल्या नायब तहसीलदारावरच प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून प्रशासनालाही आव्हान मिळाले आहे. त्यामुळे खनिज माफीयांवर नियंत्रण मिळविण्याचे आव्हान यंत्रणेपुढे आहे.

येवल्यातील पारेगाव येथे तळ्यात अवैध मुरूम उत्खनन आणि वाहतूक सुरू होती. परिसरातील ग्रामस्थांनाही त्याचा मोठ्या प्रमाणावर त्रास होत होता. त्यामुळे याबाबत नागरिकांनी तक्रार केल्यावर महसूल विभागाने कारवाई केली केली  

पारेगाव (येवला) येथे तळ्यात मुरुमाचे उत्खनन आणि वाहतूक सुरू होती. त्याबाबत  पंकज नेवासे यांनी तक्रार केली. नायब तहसीलदार आबा महाजन आणि वैभव भड तसेच संतोष आठवले या आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी गेले होते. त्यांनी उत्खनन करणाऱ्या माफियांवर कारवाई सुरू करताच माफीयांनी अधिकाऱ्यांनाच आव्हान दिले.

खनिज माफियांनी नायब तहसीलदार आणि कर्मचाऱ्यांवर थेट हल्ला केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. नायब तहसीलदारांनी यासंदर्भात पोलिसात तक्रार केली आहे. येवला शहर पोलिसांनी नायब तहसीलदारांवर शासकीय कामकाजात अडथळा आणून प्राण गात खाल्ल्या केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. राहुल आहेर आणि शुभम परदेशी यांना ताब्यात घेण्यात आले. 

जिल्ह्यात गोदावरी आणि गिरणा नदीच्या खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळूचा उपसा होतो. या संदर्भात स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या आहेत. मात्र महसूल आणि पोलिस यंत्रणेला या माफियांकडून थेट विकत घेऊन आव्हान दिले जाते. अफियांचा थेट सत्ताधारी राजकीय पक्षांमध्ये वावर असल्याने त्यांनी थेट प्रशासनाला आव्हान दिले आहे. 

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT