Shiv Sena Nashik  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Shiv Sena : ठाकरेंचे 12 नगरसेवक शिंदेंच्या ताफ्यात जाणार? नाशिकमध्ये दोन्ही शिवसेनेचे नेते एकाच फ्रेममध्ये, ससपेन्स वाढला

Nashik Politics, Shiv Sena Nashik : नाशिक महापालिकेतील उबाठाचे १२ नगरसेवक हे शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. असे असताना आता एका लग्नसोहळ्यातील एक फोटो व्हायरल झाला असून त्यात दोन्ही बाजुंचे नेते एकाच फोटोत दिसत आहे.

Ganesh Sonawane

Nashik Politics : एकनाथ शिंदे हे नाशिक महापालिकेत 'ऑपरेशन टायगर' राबविण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 12 नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याच्या चर्चा आहे.

उबाठाकडून डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर हे त्यासाठी काल नाशिकमध्ये आले होते. त्यांच्या उपस्थितीत झालेल्या काळाराम मंदिरातील रामरक्षा आंदोलन महाआरतीला ठाकरे गटाच्या एकुण पंधरा नगरसेवकांपैकी केवळ चारच नगरसेवक उपस्थितीत राहिल्याने नगरसेवकांच्या पक्षांतराच्या चर्चेला अधिकच बळ मिळालं आहे.

दरम्यान, असे असताना आता दोन्ही शिवसेनेचे नेते एकाच लग्न सोहळ्यात एकत्र आल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यांचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. लग्न सोहळ्यातील 'त्या' व्हायरल फोटोने सस्पेन्स आणखी वाढवला आहे.

उबाठाचे १२ नगरसेवक शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आलेले असतानाच, नाशिकमधील एका लग्न सोहळ्यात दोन्ही शिवसेनेतील नेते एकत्र आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

शिंदेंच्या शिवसेनेचे नेते व मंत्री दादा भुसे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, महानगरप्रमुख प्रवीण (बंटी) तिदमे यांच्यासह ठाकरे यांच्या शिवसेनेचे संपर्कनेते रवींद्र मिर्लेकर आणि माजी आमदार वसंत गीते हे एकाच फ्रेममध्ये एकत्र पाहायला मिळाले. एका बाजूला पक्षफुटीच्या चर्चा असताना दुसऱ्या बाजूला या नेत्यांची एकत्र उपस्थिती निव्वळ योगायोग आहे की, यामागे काही राजकीय सस्पेन्स दडला आहे, याबाबत आता राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

नाशिकमध्ये ठाकरे गटाचे एकुण 15 नगरसेवक आहेत. यातील १० ते १२ नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने यापूर्वीही उद्धव ठाकरे यांच्या गटाला अनेकदा हादरे दिले आहेत. त्यामुळे आताही नगरसेवकांच्या फुटीच्या चर्चा तापल्या असून ठाकरे गट सावध झाला आहे. ठाकरे गटाकडून नगरसेवकांच्या बैठका घेऊन डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यात ठाकरे गटाला कितपत यश येतं ते पाहावे लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT