Rajabhau Waje Nashik rally updates Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Rajabhau Waje: नाशिकचा ‘राजा’ मैदानात! राजाभाऊ वाजेंचे जंगी स्वागत; आता भगवा अधिक जोमाने डोलणार!

Rajabhau Waje grand welcome in Nashik: नाशिकच्या मतदारांच्या विश्वासाला खासदार राजाभाऊ वाजे जागले, राष्ट्रवादीचे खासदार भास्करराव भगरेही आले स्वागताला.

Sampat Devgire

Shivsena UBT News: शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने प्रलोभनांनी उद्धव ठाकरे पक्षाचे सहा खासदार फोडले. या फुटीच्या महाराष्ट्रभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. जनमानसात त्याबाबत संताप निर्माण झाला. शिवसेना ठाकरे समर्थकांत त्याच्या तीव्र प्रतिक्रीया आहेत.  

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे सहा खासदार फुटले. त्यावर जनतेत किती क्षोभ आहे याची प्रचिती आज नाशिक येथे आली. निष्ठावंत खासदार राजाभाऊ वाजे नवी दिल्लीहून रेल्वे स्थानकावर आले असता त्यांच्या स्वागताला रेल्वे स्थानकावर हजारो कार्यकर्ते आणि नागरिकांनी गर्दी केली होती.

खासदार वाजे आज सकाळी नाशिकला रेल्वे स्थानकावर आले. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी त्यांच्या स्वागतासाठी गर्दी केली होती. "नाशिकचे राजे फक्त राजाभाऊ वाजे" यासह विविध घोषणांनी नाशिक रोड रेल्वे स्थानक दणाणून सोडण्यात आले.

शिवसेनेचे संपर्क नेते दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गीते, शहरप्रमुख प्रथमेश गीते, युवा सेनेचे छोटू ताजनपुरे, नगरसेवक केशव पोरजे, भारतीताई ताजनपुरे, नगरसेवक योगेश गाडेकर, माजी नगरसेवक भैय्या मणियार यांसह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

खासदार वाजे गाडीतून उतरताच त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा जय जय कार करीत फुटीर खासदारांच्या नावाने संताप व्यक्त करण्यात आला.  

यावेळी झालेल्या स्वागताने खासदार वाजे भारावून गेले होते. लोकसभा निवडणूक जिंकल्याचा जो आनंद होता त्याच्या दुप्पट आनंद आज मला झाला आहे. सहा खासदार फुटले हे व्हायला नको होते. मी मात्र अखेरपर्यंत पक्षासोबत आणि निष्ठेने राहणार आहे. आता अधिक ताकदीने शिवसेना ठाकरे पक्षाला मजबूत करण्यासाठी सगळे मिळून काम करू, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. 

आज शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त मुंबई येथे होणाऱ्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणार आहे. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो आदेश देतील त्याचे पालन केले जाईल. पक्षात तोडफोड करण्याची जी खेळी झाली आहे त्याबाबत राज्यातील जनता अत्यंत प्रक्षुद्ध आहे. खासदार फोडणे हे कोणालाही पसंत पडलेले नाही, असेही वाजे यांनी यावेळी सांगितले. 

गेल्या काही दिवसापासून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातील खासदार फुटणार अशी चर्चा होती. खासदार फुटल्यावर त्यावर समाज माध्यमांवर तीव्र आणि संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. त्यात खासदार वाजे पक्ष सोबत राहिल्याने सामान्य जनता आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे भरभरून कौतुक केले. नाशिकच्या मतदारांच्या भावनांची कदर करून निष्ठा दाखवणाऱ्या वाजे यांना पुढील निवडणुकीच्या शुभेच्छांचा वर्षाव समाज माध्यमांतून व्यक्त झाला आहे. या पार्श्वभूमीवर नासिक रोड रेल्वे स्थानकावर झालेल्या जंगी स्वागतातून त्याची प्रचिती आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT