Sudhakar Badgujar & Arvind Sawant Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Arvind Sawant Politics: अरविंद सावंत यांनी सुधाकर बडगुजर प्रकरणावरून भाजपची लाज काढली; म्हणाले, आता सलीम कुत्ताची मांजर केली का?

Nashik Shiv Sena Uddhav Thackeray leader Arvind Sawant criticized BJP, literally embarrassed it-उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने नाशिक महापालिकेच्या कारभारावरून भाजपला त्याची जागा दाखवून देण्याचा निर्धार केला.

Sampat Devgire

Shivsena UBT News: नाशिक महापालिका निवडणुकीच्या प्रचारात रंग भरू लागला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने आता भाजपला टार्गेट केले आहे. महापालिकेच्या कारभारात भाजपने बाजार मांडला, असा आरोप त्यांनी केला.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते खासदार अरविंद सावंत यांनी आज नाशिक येथे महापालिका निवडणुकीचा आढावा घेतला. त्यांनी शिवसेना कार्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. निवडणुकीत भाजपच्या कारभाराचा फोलपणा मांडून भाजपला उघडे पाडावे असे आवाहन त्यांनी केले.

महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात नाशिक महापालिका निवडणुकीत थेट सामना होत आहे. नाशिकच्या जनतेला भाजपचा खोटेपणा आणि गैरकारभाराचा उभग आला आहे. भाजपच्या राजकीय गोंधळाला मतदार उत्तर देतील, असे सावंत म्हणाले.

माजी नगरसेवक सुधाकर बडगुजर प्रकरणावरून खासदार सावंत यांनी भाजपला टार्गेट केले. विधानसभेत आणि जाहीरपणे भाजपने बडगुजर यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. पोलिसांचा आणि सत्तेचा गैरवापर करून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्यांना त्रास दिला होता.

भाजप नेत्यांनी बडगुजर हे मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी सलीम कुत्ता यांच्याशी संबंधित असल्याचा आरोप केला होता. आता त्यांना प्रवेश देत कुटुंबातच अनेकांना उमेदवारी दिली आहे. आता त्यांचा डॉबरमॅन झाला की मांजर? असा प्रश्न सावंत यांनी केला.

नाशिक महापालिकेत भाजप गेली पाच वर्ष सत्तेत होता. नाशिकला एक सांस्कृतिक सामाजिक आणि अध्यात्मिक पार्श्वभूमी आहे. मात्र महापालिकेत त्यांनी अक्षरशा व्याभिचार सुरू केला आहे. त्यांच्या या कारभाराने नाशिकच्या प्रतिमेला आणि प्रतिष्ठेला काळीमा लागला आहे, असा दावा सावंत यांनी केला.

सर्व शहरवासीय आणि पर्यावरणप्रेमी तपोवन वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरले आहे. मात्र भाजपचे नेते तपोवन आतील वृक्षतोडीवर ठाम आहेत. आम्ही दुसरीकडे झाडे लावू असे ते सांगतात. अशी भूमिका घेताना त्यांना लाज वाटते का? अशा परखड शब्दात उद्धव ठाकरेंच्या नेत्याने भाजपचा समाचार घेतला.

खासदार संजय राऊत हे नाशिकच्या शिवसेना पक्षाचे संपर्क नेते आहेत. मात्र सध्या प्रकृतीच्या कारणाने ते मुंबईत अडकून पडले आहेत. मी यापूर्वी नाशिकचा संपर्क नेता होतो. त्यामुळे नाशिकच्या निवडणुकीत लक्ष घालणार असल्याचेही खासदार सावंत यांनी सांगितले.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT