

BJP controversial statement Latur : महापालिका निवडणुकीचा प्रचार तापलेले असतानाच, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी, दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानावर लातूरकर चांगलेच संतापले आहेत. उद्या बुधवारी लातूर बंदची हाक दिली आहे.
यातच 'प्रहार'चे बच्चू कडू यांनी रवींद्र चव्हाणांच्या या आग लावणाऱ्या वादग्रस्त विधानावर संताप व्यक्त केला. 'रवींद्र चव्हाणांसारखे, दहा जरी पैदा झाले, तरी विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जाणार नाहीत,' असा टोला बच्चू कडू यांनी लगावला आहे.
भाजपचे (BJP) रवींद्र चव्हाण यांच्या वादग्रस्त विधानावर बच्चू कडू म्हणाले, "आठवणी कोणाच्या पुसल्या जात नाहीत, जशा प्रभू रामचंद्राच्या पुसल्या गेल्या नाहीत. रवींद्र चव्हाणांसारखे, दहा जरी पैदा झाले तरी, विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जाणार नाहीत." रवींद्र चव्हाण यांनी एवढी मस्ती करू नये, असाही सवाल बच्चू कडू यांनी केला.
राज्यातील महापालिका निवडणुकांमधील (Municipal Election) युती आणि आघाडीवर भाष्य करताना बच्चू कडू यांनी, युती आणि आघाडी काही राहिली नाही. ही निवडणूक पैसा आणि धर्म, जातीची झाली आहे, आता विषय संपलेला आहे. लोकशाही म्हणण्यातही काही अर्थ नाही, अशी प्रतिक्रिया दिली.
मुंबई महापालिका निवडणुकीनिमित्ताने ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. निवडणुकीला देखील ते दोघे एकत्रपणे समोरे जात आहेत. यावर बोलताना, बच्चू कडू यांनी भाऊ भावाला भेटणार नाही, तर काय दुसऱ्याला भेटणार का? असा सवाल केला.
AIMIMचे असदुद्दीन ओवैसी यांनी रवींद्र चव्हाण यांच्या वादग्रस्त विधानावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "विलासराव देशमुखांच्या काळात अनेक चांगली कामे झाली आणि काही चुका देखील झाल्या. मात्र ते आता हयातीत नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल असे बोलणं योग्य नाही. त्यांच्याच काळात मुंबई रेल्वे आणि मालेगाव ब्लास्टची घटना घडली. त्यामध्ये काही निर्दोष लोक पकडले गेले," असे असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.