Sinnar Taluka Politics : राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या सिन्नर तालुक्याच्या ग्रामीण राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. मुदत संपूनही जात पडताळणी प्रमाणपत्रासंदर्भात कागदपत्रे सादर न केल्याने तालुक्यातील 79 ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाच्या या कारवाईने सिन्नर तालुक्यातील अनेक गावांच्या कारभारावर मोठा परिणाम होणार आहे.
जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 10-1 'अ'नुसार या सदस्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना ग्रामपंचायत सदस्यांवर झालेल्या या कारवाईने तालुक्याची राजकीय समीकरणे देखील बदलणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत राखीव जागेवर निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. 2019 मध्ये तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये राखीव जागेवर निवडणूक लढत उमेदवारांनी विजय संपादन केला होता. या सर्व विजयी उमेदवारांनी नियमाप्रमाणे विहित मुदतीत जातपडताळणी प्रमाणपत्रांबाबतची कागदपत्रे जमा करणे गरजेचे होते; परंतु मुदत संपूनही उमेदवारांनी कागदपत्रे जमा केली नाहीत. शासनाने अनेकदा मुदतवाढ देऊनही सदस्यांनी मात्र त्याकडे दुर्लक्ष केले.
त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने यासंदर्भात पडताळणी केली असता संधी देऊनही संबधित सदस्यांनी त्यांचे जात पडताळणीचे वैध प्रमाणपत्र व कागदपत्रे सादर केली नसल्याचे आढळून आले. त्यामुळे अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी या सर्व सदस्यांना अपात्र घोषित करण्याचे आदेश दिले आहेत.
गेल्या महिन्यात येवला तालुक्यात जिल्हा प्रशासनाने कारवाई केली होती. जातपडताळणीअभावी जिल्हा प्रशासनाने येवला तालुक्यातील सदस्यांना अपात्र घोषित केले होते. परंतु या सदस्यांनी न्यायालयात धाव घेतली व त्यावर स्थगिती मिळवली होती. त्यानंतर आता सिन्नर तालुक्यातही तशीच कारवाई जिल्हा प्रशासनाने केली आहे. एकाच वेळी 79 सदस्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे.
कोण कोणत्या गावांतील सदस्य झाले अपात्र ?
मुसळगाव, सोनांबे, विंचूर दळवी, चंद्रपूर, धोंडबार, निमगाव देवपूर, सांगवी, धारणगाव, ब्राह्मणवाडे, मऱ्हळ खुर्द, देशवंडी, निहऱ्हाळे, चिंचोली, सोनारी, मेंढी, औंढेवाडी, आटकवडे, सावता माळीनगर, दत्तनगर, पांगरी बुद्रुक, कोनांबे, बेलू, चास, पिंपळे, बोरखिंड, आडवाडी, मलढोण, जामगाव, रामनगर, धोंडवीरनगर, दुशिंगपूर, वडझिरे, हिवरे, केपानगर, यशवंतनगर, वडगाव सिन्नर, नळवाडी, खंबाळे, पाथरे बुद्रुक, कुंदेवाडी, सोनगिरी, कणकोरी, चोंढी, पुतळेवाडी, शिवडे, आशापुरी, घोटेवाडी, फर्दापूर, दहीवाडी, दातली, पिंपळगाव, भरतपूर, दोडी खुर्द, कोमलवाडी बोरखिंड, पांढुर्ली, सरदवाडी.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.