Maratha Reservation Politics: आरक्षणावरून राष्ट्रवादीत ओढाताण; भुजबळांचा विरोध तर कोकाटे म्हणतात राजकारण नको!

Chhagan Bhujbal statement on Maratha reservation: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातील मंत्र्यांमध्येच विसंवादाचे वातावरण.
Chhagan Bhujbal, Manoj Jarange Patil & Manikrao Kokate
Chhagan Bhujbal, Manoj Jarange Patil & Manikrao KokateSarkarnama
Published on
Updated on

Manikrao Kokate News: मराठा समाजातील कुणबी घटकांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिले जाणार आहे. राज्य शासनाने हा निर्णय घेतला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातच यावरून राजकीय ओढाताण सुरू झाली आहे.

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याद्वारे कोणत्याही घटकावर अन्याय होणार नाही अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे. असे असले तरी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या मंत्र्यांमध्येच यावरून राजकीय ओढतान होत आहे.

या प्रश्नावरून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. याबाबत आज ते निर्णय घेण्याची शक्यता आहे. सुरू असतानाच क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मात्र आरक्षणाच्या प्रश्नावर राजकारण नको असे बजावले आहे.

Chhagan Bhujbal, Manoj Jarange Patil & Manikrao Kokate
Onion Export Ban: ट्रम्प इफेक्ट; सुप्रिया सुळेंचा ‘तो’ इशारा ठरला खरा; आता कांदा उत्पादक उडवणार सरकारची झोप!

मराठा समाजाच्या न्याय हक्कांसाठी शेवटच्या क्षणापर्यंत आपण प्रयत्न करू, असे क्रीडा मंत्री कोकाटे यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षण उप समितीचे सदस्य म्हणून मंत्री कोकाटे यांचा सकल मराठा समाज आणि शहरातील मराठा संघटनांतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी कोकाटे यांनी राज्य शासनाची भूमिका समतोल आणि न्याय असल्याचे म्हटले.

ते म्हणाले, प्रदीर्घ काळ लढा दिल्यानंतर गरजवंत आणि गरीब व उपेक्षित असलेल्या मराठा समाजातील घटकांना आरक्षण मिळणार आहे. या घटकांची गरज लक्षात घेऊन प्रत्येकाने त्यांच्या मागे उभे राहिले पाहिजे. त्याला विरोध करून अथवा अन्य मार्गाने अडथळे आणून राजकारण करू नये.

मराठा समाजाने लाखोच्या संख्येने राज्यभर मोर्चे काढले. तरीही मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर निर्णय घेण्यात राज्य शासन अपयशी ठरले. उच्च न्यायालयात टिकणारा निर्णय न मिळाल्याने मराठा समाजात अस्थिरता निर्माण झाली आहे. मराठवाड्यात हा प्रश्न अत्यंत गंभीर आहे.

मराठा आरक्षणाला विरोधाची भूमिका घेणारे राजकीय नेते आणि अन्य आंदोलकांनी ही वास्तविक स्थिती लक्षात घ्यावी. मनोज जरांगे पाटील यांनी यासंदर्भात कायद्याचे पालन करून आंदोलन केले. तरीही काही मंडळी यामध्ये राजकारण आणत आहेत याची खंत वाटते.

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानावरील आंदोलनात शासनाने त्यांच्या पाच मागण्या मान्य केल्या. हैदराबाद गॅझेटची मागणी मान्य झाल्याने कुणबी घटकांना ओबीसी आरक्षण मिळणार आहे. मात्र यावरून महायुती सरकारमधील मंत्र्यांमध्येच विविध विचारप्रवाह आहेत, असे यानिमित्ताने दिसून येते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com