Girish Mahajan, Eknath Khadse. Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Khadse News : राणेंनंतर आता खडसेंची बारी; दाऊदच्या नातेवाईकाचं लग्न, महाजनांची हजेरी...

संपत देवगिरे

Eknath Khadse News : विधानसभेत भाजपचे नितेश राणे यांनी शिवसेनेच्या सुधाकर बडगुजर यांच्याविषयी उपस्थित केलेल्या प्रश्नाला आज राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे यांनी जसाश तसे उत्तर दिले. मुंबई बाँम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिम याच्या नातेवाईकाच्या लग्नात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या सहभागाचे छायाचित्रच खडसे यांनी झळकवले.

यावेळी बडगुजर यांची चौकशी करता, मग महाजनांची का होत नाही ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसचे एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी आक्रमक होत शिवसेना ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांच्या चौकशी प्रकरणी सवाल उपस्थित केला. आमदार नितेश राणे यांनी नाशिक महानगरप्रमुख बडगुजर यांची छायाचित्रे सभागृहात झळकवली होती.

त्याला तेवढ्याच आक्रमकपणे खडसे यांनी उत्तर दिले. गिरीश महाजन (Girish Mahajan) यांची सुधाकर बडगुजर यांच्याप्रमाणे चौकशी करण्याची मागणी सभागृहात करण्यात आली. कारण महाजन यांचे मुंबई बाँम्बस्फोटातील आरोपी दाऊद ईब्राहीम याच्या नातेवाईकाच्या लग्नातील सहभाग होता. त्यांचे फोटो पुरावे आमच्याकडेही असल्याचे त्यांनी सांगितले.

आज मंत्री महाजन, पोलिस अधिकारी, भाजपचे विविध नगरसेवक, गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी मुंबई बाँम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहीम प्रकरणात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रवीण दरेकर यांनी मंत्र्यांचे नाव घ्यायचे असेल तर ही चर्चा व नावे कामकाजातून काढून टाकावी, अशी मागणी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यानंतर सभागृहात गोंधळ झाला. यावेळी शिवसेनेचे गटनेते अनिल परब, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांसह काही सदस्यांनी आक्रमक होत या सभागृहात कोणत्याही सदस्यांना प्रश्न मांडण्याचा अधिकार असल्याचे सांगत हा विषय लावून धरण्याचा प्रयत्न केला. त्यावर सभापती नीलमताई गोऱ्हे यांनी हा विधानसभेचा विषय असल्याने तुमचा 289 चा प्रस्ताव फेटाळत असल्याचे सांगून सभागृह दहा मिनिटांसाठी तहकूब करीत असल्याचा निर्णय दिला.

(Edited by Amol Sutar)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT